Hot Posts

6/recent/ticker-posts

नातेपुते येथे पाकिस्तानच्या राष्ट्रध्वजाची होळी

 नातेपुते येथे पाकिस्तानच्या राष्ट्रध्वजाची होळी




नातेपुते (कटूसत्य वृत्त):- पहलगाम हत्याकांडाच्या निषेधार्थ नातेपुते शहरात शिवसेना शिंदे गटाच्या वतीने तालुकाध्यक्ष सतीश सपकाळ यांचे नेतृत्वाखाली भव्य निषेध मोर्चेचे आयोजन करण्यात आले होते.
 यावेळी पाकिस्तानच्या राष्ट्रध्वजाची होळी करण्यात आली. तत्पूर्वी पाकिस्तानच्या ध्वजावर लहान मुलांकडून लघु शंका करण्यात आली.
या निषेध मोर्चात शिवसेना शिंदे गट ,भारतीय जनता पक्ष, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद ,रिपब्लिकन पक्ष (आठवले गट) व इतर सर्व राष्ट़प्रेमी बहुसंख्येने हजर होते.
येथील पुरातन श्री. राम मंदिरापासून शिवसेना तालुकाध्यक्ष सतीश सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली निषेध मोर्चा सुरू करण्यात आला.
 प्रत्येकाच्या हातात भगवे ध्वज व समोर राष्ट्रध्वज होता. यावेळी पाकिस्तान मुर्दाबाद!! जय श्रीराम!! हर हर महादेव !!आदी घोषणा देण्यात येत होत्या.
निषेध मोर्चा चा समारोप लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौकात करण्यात आला. या ठिकाणी हनुमंतराव सूळ, किशोर पलंगे ,महादेव तूपसुंदर, बादल सोरटे ,सतीश सपकाळ आदींनी मनोगत व्यक्त केले.
यानंतर या भ्याड हल्ल्यात धारातीर्थी पडलेल्या पर्यटकांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.
पाकिस्तानी राष्ट्रध्वजावर लघु शंका करण्यात आली. आणि  तालुकाध्यक्ष सतीश सपकाळ यांच्या हस्ते पाकिस्तानच्या ध्वजाची होळी करण्यात आली.
नातेपुते पोलीस ठाण्याचे सपोनी महारुद्र परजणे यांना निषेधाचे निवेदन देण्यात आले.
 यावेळी  समीर शेख, राजाभाऊ कुडाळकर, वैभव शहा, माऊली उराडे ,भीमराव पाटील, हनुमंतराव सूळ ,धैर्यशील पांढरे, बादल सोरटे, विनोद रणदिवे
श्रीगणेश पागे, किशोर पलंगे, शशि कल्याणी, गिरीश पैठणकर ,अमर भिसे, शिवसेना शहराध्यक्ष निखिल पलंगे ,रुपेश इंगोले, अशोक शिंदे ,अभिजीत चांगण, एकनाथ ननवरे, सनी पलंगे,व इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चौकटीत.....
रविवार ता.२७ रोजी माळशिरस बंदचे आवाहन शिवसेना शिंदे गटाच्या वतीने करण्यात आले आहे...
तालुका अध्यक्ष सतीश सपकाळ

Reactions

Post a Comment

0 Comments