आयपीएल सामन्यांवर सट्टा - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, April 25, 2025

आयपीएल सामन्यांवर सट्टा

 आयपीएल सामन्यांवर सट्टा

 पिंपरी-चिंचवड (कटूसत्य वृत्त):-आयपीएलच्या दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध लखनऊ सुपर जॉईंट या क्रिकेट सामन्यावर ऑनलाइन माध्यमातून सट्टा लावणाऱ्या सहा जणांना पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या गुंडा विरोधी पथकाने अटक केली. ही कारवाई मंगळवारी (दि. २२) रात्री पावणे दहा वाजताच्या सुमारास ब्ल्यू रिज सोसायटी, हिंजवडी येथे करण्यात आली. अंकुश यशवंत कुशवाह (वय २५), विक्रम ललित झा (वय २५), विकास गोविंद पारधी (वय २४), आयुष कुमार झा ( वय २६), गौरव शिवराम ठेंगरी (वय २६, रा. हिंजवडी), प्रेमकुमार ईश्वरदास राजवाणी (वय ५२, मध्य प्रदेश) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

याप्रकरणी पोलीस अंमलदार गणेश मेदगे यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. कारवाई मध्ये पोलिसांनी चार लॅपटॉप, १८ मोबाईल फोन असा एकूण पाच लाख २० हजार ६१० रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. तसेच सहा जणांना अटक केली आहे. हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास करीत आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages