भारतानं मुसक्या आवळताच पाकिस्तानचा थयथयाट
सुरक्षा व्यवस्थेत गफलत; केंद्र सरकारने मान्य केली चूक
नवी दिल्ली (वृत्त सेवा):- पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्या आहेत, त्यानंतर आता पाकिस्ताननं देखील मोठा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानने भारतासोबतच्या व्यापारावर बंदी घातली आहे.
भारत सरकारच्या या निर्णयानंतर आता पाकिस्तानच्या सुरक्षा समितीची बैठक पार पडली आहे, या बैठकीमध्ये मोठा निर्णय घेण्यात आला आहे, पाकिस्तानकडून भारतासोबतच्या व्यापारावर बंदी घालण्यात आली आहे, तसेच पाकिस्तानच्या बाजुची वाघा बॉर्डर देखील बंद करण्यात आली आहे.
पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या हल्ल्यात 28 जणांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी केंद्र सरकारने काही अत्यंत धोरणात्मक निर्णय घेऊन पाकिस्तानची कोंडी केली आहे.
हल्ला झाल्यापासून आतापर्यंत काय काय घडले याची माहिती देण्यासाठी आज केंद्र सरकारने सर्व पक्षीय बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत पहलगाम प्रकणी सुरक्षेत चूक झाल्याचे केंद्र सरकारने मान्य केले. तर या हल्ल्यातील एकही दशतवाद्याला सोडणार नाही असे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे.
गेले काही वर्षे जम्मू काश्मीरमध्ये लोक शांततेत व्यापार करत होते. पर्यटक येत होते. सर्व व्यवहार सुरळीत सुरू होते. मात्र या घटनेमुळे वातावरण बिघडले आहे अशी चिंता सर्वांनी बैठकीत व्यक्त केली. आजच्या बैठकीत काय काय घडले याबद्दलची माहिती केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी दिली.
आज बैठकीत विविध सुरक्षा संस्थांच्यामार्फत पहलगाम हल्याची माहिती देण्यात आली. घटना काशी घडली, कुठे चूक झाली याबाबत माहिती देण्यात आली. पुन्हा आशा घटना होऊ नयेत यावर देखील बैठकीत चर्चा झाली. सर्व राजकीय पक्ष सरकारसोबत असल्याचे त्यांनी सांगितले. दहशतवादाचा बीमोड करण्यासाठी सरकार जे करेल त्यात आम्ही सोबत असल्याचे सर्व पक्षांनी स्पष्ट केले.
'सिंधु जल करारा'ला स्थगिती देताच भारत अॅक्शन मोडमध्ये
भारताने पाकिस्तानकडे जाणारे पाणी रोखले आहे. चिनाब नदीवरील असणाऱ्या धरणातून पाकिस्तानला पाणीपुरवठा होत असते. भारताने चिनाब नदीचे पाणी रोखले आहे. त्यामुळे आता पाकिस्तानला एक थेंब देखील पाणी भारताकडून मिळणार नाहीये. याबाबतचे फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहेत.
पाकिस्तानने इथेही मारली भारताची नक्कल
भारताने दणका दिल्यानंतर आज पाकिस्तान सरकारची महत्वाची बैठक पार पडली आहे. यामध्ये पाकिस्तानने काही महत्वाचे निर्णय घेतले आहेत. पाकिस्तानने भारतासाठी आपले हवाई क्षेत्र बंद केले आहे. पाकिस्तानने भारतासोबतच व्यापार पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय कंपन्यासोबतचा व्यापार पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
पाकिस्ताने देखील त्यांच्या येथील भारतीय उच्चायुक्तलयातील अधिकाऱ्यांना भारतात जाण्याचे आदेश दिले आहेत. पाकिस्तानने भारताप्रमाणेच अटारी-वाघा बॉर्डर बंद करण्याचा निर्णय घेतला. तर पाकिस्तानमधील भारतीयांचा व्हिसा रद्द केले आहे. तसेच त्यांना भारतात परतण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
0 Comments