Hot Posts

6/recent/ticker-posts

लोकमंगल कृषी महाविद्यालयाची शैक्षणिक सहल उत्साहात संपन्न

 लोकमंगल कृषी महाविद्यालयाची शैक्षणिक सहल उत्साहात संपन्न




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- श्रीराम ग्रामीण संशोधन व विकास प्रतिष्ठान संचलित आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्नित लोकमंगल कृषी  महाविद्यालय वडाळा येथील तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहल दिनांक २ ते ३ एप्रिल या कालावधीमध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. कृषी विद्यापीठाची कार्यप्रणाली, संशोधन, शिक्षण, विस्तार, आणि आधुनिक कृषी  तंत्रज्ञान इत्यादी बाबी जाणून घेण्याकरिता या दोन दिवसीय अभ्यास दौऱ्याचे आयोजन राहुरी येथे करण्यात आले होते. या शैक्षणिक भेटीदरम्यान विद्यार्थ्यांनी विद्यापीठातील कृषी माहिती व तंत्रज्ञान केंद्र, ग्रंथालय, गाई संशोधन केंद्र, बी प्रक्रिया केंद्र, फुले बेकरी, रोपवाटिका, कृषी अवजारे संग्रहालय, जलसिंचन उद्यान, स्वयंचलित हवामान केंद्र, कापूस सुधार प्रकल्प, औषधी वनस्पती संशोधन केंद्र, ज्वारी संशोधन केंद्र, उद्यानविद्या प्रक्षेत्र, ड्रोन प्रयोगशाळा विभाग, शेळी व मेंढी सुधार प्रकल्प, जिवाणू खते उत्पादन प्रकल्प, मधुमक्षिका पालन विभाग आणि काढणी पश्चात तंत्रज्ञान विभाग इत्यादी विविध विभागांना भेटी देऊन शास्त्रोक्त माहिती जाणून घेतली. सदरील भेटीद्वारे विद्यार्थ्यांमध्ये कृषी क्षेत्रातील भविष्यातील सकारात्मक दृष्टिकोनाविषयी जागरूकता निर्माण झाली आणि कृषी उद्योजक घडण्याची पायाभरणी देखील या निमित्ताने झाली. सदरील शैक्षणिक भेटीकरिता तृतीय वर्षातील ७६ विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला यात  ४९ मुले व २७ मुलींचा समावेश होता. सदरील शैक्षणिक सहली च्या आयोजनासाठी संस्थेचे संस्थापक श्री. सुभाष बापू देशमुख, अध्यक्ष श्री.रोहनजी देशमुख, सचिवा डॉ. अनिता ढोबळे यांचे प्रोत्साहन मिळाले. या शैक्षणिक अभ्यास दौऱ्याच्या संपन्नतेसाठी लोकमंगल कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अमोल शिंदे यांचे अमूल्य मार्गदर्शन लाभले. संपूर्ण शैक्षणिक अभ्यास दौऱ्याचे आयोजन आणि यशस्वीतेसाठी प्रा.नवनाथ गोसावी, डॉ. शिवकुमार वरारकर, प्रा. नम्रता गोरे आणि प्रा. कल्पना मिटकरी यांनी विशेष परिश्रम घेतले. विद्यापीठातील आणि संशोधन केंद्र परिसरातील सर्व वरिष्ठ शास्त्रज्ञ आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी विद्यार्थ्यांशी चर्चासत्र, प्रात्यक्षिके आणि प्रश्नोत्तराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या ज्ञानात अतुलनीय भर पाडण्याचे योगदान दिले. या त्यांनी दिलेल्या सहकार्याबद्दल महाविद्यालयाच्या वतीने त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले. लोकमंगल कृषी महाविद्यालया मार्फत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा शैक्षणिक सहलींचे आयोजन नियमित स्वरूपात करण्यात येते.
Reactions

Post a Comment

0 Comments