पालखी सोहळ्यासाठी प्रत्येक गावात भव्य व प्रशस्त तळाच्या जागेची गरज- योगी निरंजन नाथ
नातेपुते (कटूसत्य वृत्त):- श्री. संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या आषाढी वारीतील पालखी सोहळ्यासाठी प्रत्येक गावात भविष्याचा विचार करून भव्य व प्रशस्त तळाची जागेची गरज असून यासाठी शासन दरबारी प्रयत्न सुरू आहेत अशी माहिती आळंदी देवस्थानचे मुख्य विश्वस्त योगी निरंजन नाथ यांनी सांगितले.
दरवर्षी आळंदी ते पंढरपूर या श्री.ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्गावर मुक्कामाच्या ठिकाणी प्रश्न निर्माण होत आहेत.जागा मालकांना योग्य मोबदला देऊन पालखी तळाचा प्रश्न आम्ही मिटवणार आहोत. त्यासाठी शासन दरबारी आमचे प्रयत्न सुरू आहेत अशी माहिती योगी निरंजन नाथ यांनी दिली.
यावेळी प्रांताधिकारी विजया पांगरकर ,तहसीलदार सुरेश शेजुळ ,नातेपुते नगरपंचायतीचे मुख्याधिकारी डॉ.कल्याण हुलगे ,सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता सुनिता पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक महारुद्र परजणे, विद्युत मंडळाचे अधिकारी ,महसूल विभागाचे मंडलाधिकारी , गाव कामगार तलाठी उपस्थित होते.
नातेपुते करांच्यावतीने उपनगराध्यक्ष अतुल पाटील,नंदु लांडगे यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत केले. यावेळी आळंदी देवस्थानचे मुख्य विश्वस्त योगी निरंजन नाथ, पालखी सोहळा प्रमुख डॉ.भावार्थ देखणे , चोपदार रामभाऊ चोपदार, बाळासाहेब चोपदार, व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर, वारकरी महामंडळाचे सचिव ह भ प मारुती कोकाटे, भाऊ महाराज फुरसुंगी कर ,आदी मान्यवर उपस्थित होते.
चौकटीत...,
१)भविष्यात विस्तीर्ण तळ गरजेचे आहेत अन्यथा नातेपुतेचा माऊलीचा मुक्काम गावाच्या बाहेर जाऊ शकतो...
योगी निरंजनाथ.
२)माऊलीच्या प्रस्तावित तळाचा गावाला विविध उपक्रमांसाठी व भव्य क्रीडांगण म्हणून उपयोग होऊ शकतो....
रामभाऊ चोपदार
३)नातेपुते नगरपंचायतीला मागील तीन वर्षापासून शासनाकडून अनुदान मिळाले नाही....
उपनगराध्यक्ष अतुल पाटील.
0 Comments