'आदिनाथ'च्या अध्यक्षपदी आमदार नारायण पाटील
करमाळा, (कटुसत्य वृत्त):- श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी आमदार नारायण पाटील तर उपाध्यक्षपदी महेंद्र पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे.
कारखाना निवडणुकीत आमदार पाटील यांच्या नेतृत्वाखालील आदिनाथ संजीवनी पॅनलने विजय मिळविला होता. त्यांचे सर्व २१ उमेदवार विजयी झाले होते. त्यानंतर अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीकडे सर्वांचे लक्ष लागलेले होते.
दरम्यान सोमवारी कारखान्याचे अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीसाठी विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षपदी आमदार पाटील यांचीच निवड होणार हे रविवारी निश्चित झाले होते. त्याम ुळे उपाध्यक्षपदी कोणाला संधी मिळणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले होते.
या पदासाठी अनेकजण इच्छुक होते. त्यामध्ये महेंद्र पाटील यांची निवड करण्याचे ठरले. दोन्ही निवडी बिनविरोध पार पडल्या. कारखाना प्रगतिपथावर आणण्यासाठी प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही नूतन अध्यक्ष व उपाध्यक्ष यांनी दिली. निवडीनंतर त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी संचालक उपस्थित होते. नुकतीच आदिनाथ सहकारी साखर कारखान्याची निवडणूक पाडली असून यात आमदार पाटील यांनी माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्या पॅनेलचा पराभव करून कारखाना ताब्यात घेतला आहे.
0 Comments