Hot Posts

6/recent/ticker-posts

स्वामी समर्थ समाधी मठात पुण्यतिथी उत्सवाची सांगता

 स्वामी समर्थ समाधी मठात पुण्यतिथी उत्सवाची सांगता



अक्कलकोट, (कटुसत्य वृत्त):- 'गोपाळकाला गोड झाला, गोपाळाने गोड केला'च्या जयघोषात बुधवार पेठेतील श्री स्वामी समर्थ समाधी मठात श्री स्वामी समर्थ महाराजांची १४७ व्या पुण्यतिथी उत्सव सोहळ्याची परंपरेप्रमाणे आणि विधिपूर्वक गोपाळकाल्याने सांगता झाली.

प्रारंभी स्वामी महाराज यांचे परमभक्त श्री चोळप्पा महाराज यांचे वंशज अण्णू महाराज पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली श्री स्वामी समर्थ भजनीमंडळातील भारूडकार पंडित माळगे, नागनाथ जाधव, सिध्दाराम जाधव, सोन्याबापू जाधव, सिध्दाराम माने, बंडोपंत जाधव, उत्तम शिंदे, दिगंबर माने व सहकारी कलाकारांनी आपल्या सुरेल आवाजात भजन, अभंग, गवळण व भारूड सादर केले.

स्वामींच्या नामघोषात गोपाळकाल्याचा प्रसाद वाटण्यात आला. शेवटी महिलांनी फुगडीचा खेळ सादर करून उपस्थितांची मने जिंकून घेतले.

याप्रसंगी आदित्य पुजारी, सुधाकर पुजारी, महेश पुजारी, संकेत पुजारी, नितीन पुजारी, नीलेश पुजारी, पवन कुलकर्णी, कीर्तनकार संजय पाटील, अरविंद आचरेकर, गोविंद जाधव, हजरत शेख नुरुदीन बाबा सेवा मंडळाचे मुख्य समन्वयक अहमदपाशा पिरजादे, कमलाकांत होटकर, विजयकुमार कापसे, सिध्देश्वर भंडारे, सोमनाथ सुतार, मनोज शिंपी, सुशील हिरस्कर, प्रसाद कुलकर्णी, श्रीशैल कलशेट्टी आदींसह बहुसंख्य स्वामीभक्त उपस्थित होते. सूत्रसंचालन स्वामीराव सुरवसे कुरनूरकर यांनी केले.

Reactions

Post a Comment

0 Comments