महाराष्ट्र राज्य शिक्षक संघच्या राज्य उपाध्यक्ष पदी सिद्राम कटगेरी यांची निवड
मुंबई (कटूसत्य वृत्त):- मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे संपन्न झालेल्या महाराष्ट्र राज्य शिक्षक संघ (शिवाजीराव पाटील गट) च्या राज्य कार्यकारिणी मंहामंडळ सभा पार पडली. सभेस ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, आमदार निरंजन डावखरे, आमदार प्रविण स्वामी शिक्षक संघाचे जेष्ठ सल्लागार माधवराव पाटील, शिक्षक संघाचे अध्यक्ष केशवराव जाधव, सरचिटणीस लायक पटेल ,बाळासाहेब काळे, जिल्हाध्यक्ष विरभद्र यादवाड, शिवानंद भरले, उत्तमराव जमदाडे गुरुजी उपस्थित होते. सदर सभेत गेली २५ वर्ष शिक्षक संघाचे विविध पदावर काम करीत असलेले सिद्राम कटगेरी यांची राज्य उपाध्यक्ष पदी निवड केली. सिद्राम कटगेरी यांनी द सोलापूर प्राथ. शि सह.पतसंस्था मंद्रुप चे ४ वर्ष यशस्वीपणे पतसंस्थेचे कामकाज केले.
0 Comments