Hot Posts

6/recent/ticker-posts

वेळापूर मध्ये पाहायला मिळणार बैलगाडा शर्यतीचा थरार

 वेळापूर मध्ये पाहायला मिळणार बैलगाडा शर्यतीचा थरार





अकलूज (कटूसत्य वृत्त):- छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त भव्य ओपन छत्रपती केसरी बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले असून लाखो रुपयाचे बक्षीसे या निमित्ताने विजेत्यांना मिळणार आहेत तरी सर्वांनी या शर्यतीचा लाभ घ्यावा असे आवाहन अर्धनारी नटेश्वर गणेशोत्सव मंडळ व सकल मराठा समाज बांधव वेळापूर यांचे वतीने करण्यात आले आहे.

सदरच्या स्पर्धा या 23 मार्च रोजी आयोजित करण्यात आल्या असून खासदार धैर्यशील मोहिते पाटील , आ. उत्तमराव जानकर व शिवरत्न शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा शितलदेवी मोहिते पाटील आणि स्थानिक नेते मंडळींच्या प्रमुख उपस्थितीत हा बैलगाडा शर्यतीचा थरार अनुभवता येणार आहे. यासाठी प्रथम क्रमांकाचे बक्षीस हे एक लाख रुपये ठेवले असून द्वितीय बक्षीस ७१ हजार, तृतीय बक्षीस ५४ हजार, चतुर्थ बक्षीस ३१ हजार, पाचवे बक्षीस २१ हजार, सहावे बक्षीस ११ हजार, सातवे बक्षीस ७ हजार अशी बक्षिसे ठेवण्यात आली असून सदरच्या स्पर्धा या श्री महादेव देवालय ट्रस्ट च्या पाठीमागील मैदानात होणार असून अखिल भारतीय बैलगाडा संघटना व महाराष्ट्र शासनाच्या सर्व नियमांना धरून सदरच्या स्पर्धा पार पडणार आहेत. तरी नाव नोंदणीसाठी विजय पवार, प्रशांत चंदनशिव, लक्ष्मण मंडले, अशोक जाधव, नितीन भाकरे आदींशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या स्पर्धा सकाळी आठ वाजता सुरू होतील सर्व निर्णय समितीकडे राखून ठेवण्यात आलेला आहे. तरी याचा सर्वांनी लाभ घ्यावा आणि या शर्यतीचा थरार अनुभवावा असे आवाहन करण्यात आले आहे.
Reactions

Post a Comment

0 Comments