सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कर्मचाऱ्यांना भरघोस पगारवाढ देवून प्रोत्साहनपर वार्षिक वेतनवाढ
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सर्वस्तरीय अधिकारी, कर्मचारी वर्ग संघभावनेने प्रभावीपणे कामकाज करीत आहेत. गत दोन वर्षापासून बँकेच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होत असल्याने कर्मचाऱ्यांना भरघोस पगारवाढ देवून प्रोत्साहनपर वार्षिक वेतनवाढ देण्यात आली. महाराष्ट्रातील अडचणीत असलेल्या जिल्हा बँकांसाठी सोलापूर जिल्हा बँक ही रोल मॉडेल ठरलेली आहे, असे बँकेच्या १०७ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमप्रसंगी सांगण्यात आले.आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष आणि जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून बँकेच्या प्रधान कार्यालयामध्ये स्नेहमेळावा, रक्तदान शिबीर व बँकेच्या संक्रमण काळात डिपॉझिट ठेवून सहकार्य केलेल्या नागरी पतसंस्था, ठेवीदार यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात जिल्हा सहकारी बँक मर्यादित सोलापुर १०७ वा वर्धापन दिन समारंभ आले होते. याप्रसंगी सोलापूर जिल्हा सहकारी बँक कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष संजयमामा शिंदे यांनी वैयक्तिकरित्या विठ्ठल कॉर्पोरेशन म्हैसगाव यांच्या नावाने १० कोटी रुपयांच्या ठेव रक्कमेचा धनादेश सुपूर्द केला.प्रारंभी अप्पर निबंधक संतोष पाटील, विभागीय सहनिबंधक योगीराज सुर्वे, सोलापूर जिल्हा सरकारी वकील प्रदीपसिंह रजपूत, बँकेचे प्रशासक कुंदन भोळे, जिल्हा उपनिबंधक किरण गायकवाड, 'नाबार्ड'चे जिल्हा विकास व्यवस्थापक नितीन शेळके, जिल्हा विशेष लेखापरिक्षक विष्णू डोके, वस्त्रोद्योग विभागाच्या प्रादेशिक उपायुक्त उज्ज्वला पळसकर, सोलापूर शहर उपनिबंधक डॉ. प्रगती बागल आदींच्या हस्ते प्रतिमापूजन व दीपप्रज्ज्वलन करण्यात आले.सोलापूर जिल्हा बँक कर्मचारी वेल्फेअर ट्रस्टच्यावतीने रक्तदात्यांना तर सोलापूर जिल्हा सहकारी बँक कर्मचारी संघटनेच्यावतीने महिलांना भेटवस्तू देण्यात आले. यावेळी बँकेचे व्यवस्थापक आर.डी.गोटे, सहाय्यक व्यवस्थापक एम. पी. देशपांडे आदींची उपस्थिती होती. बँकेचे प्रशासक कुंदन भोळे यांनी प्रास्ताविक केले. मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र शिंदे यांनी स्वागत केले. प्रसाद लोखंडे यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राजेश गवळी,डी.ए. सुरवसे, महेशकुमार जाधव, तात्या कोळी,आनंद डांगे, सिध्व करजगीकर, दिलीप पवार, लता साठे, मंजूषा चौगुले आदींनी परिश्रम घेतले.
0 Comments