आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्व यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादीचे अभिवादन
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, शैक्षणिक अशा सर्वच अंगांनी विकासाची पायाभरणी करणारे आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार तथा पहिले मुख्यमंत्री व लोकप्रिय नेते स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या दूरदृष्टीमुळे कृषी क्षेत्रात आणि औद्योगिकीकरणात आज महाराष्ट्र राज्य आघाडीवर आहे, ते असण्यात चव्हाण साहेबांचं फार मोठं योगदान आहे. त्यांच्याच आदर्श विचारांवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची वाटचाल पुढे सुरु आहे. त्यांच्या कार्याला आणि स्मृतींना राष्ट्रवादीच्या वतीने वंदन करण्यासाठी अभिवादन करण्यासाठी सोलापूर महानगर पालिकेतील स्व यशवंतराव चव्हाण यांच्या अर्ध पुतळ्यास राष्ट्रवादीचे राज्याचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांच्या शुभ हस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.
यावेळी शहर - जिल्हाध्यक्ष संतोष पवार, कार्याध्यक्ष जुबेर बागवान, माजी परिवहन समिती सभापती आनंद मुस्तारे, महिला आघाडी अध्यक्ष संगीता जोगधनकर, जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले, प्रज्ञा सागर गायकवाड, शहर सचिव दत्तात्रय बनसोडे, सोशल मीडिया शहराध्यक्ष वैभव गंगणे, सोशल मीडिया विभाग उत्तर विधानसभा अध्यक्ष धनंजय जाधव, माणिक कांबळे , अनिस शेख यांची उपस्थिती होती.
0 Comments