मोहोळ (कटूसत्य वृत्त):- जि.प.शाळा बोपले ता.मोहोळ येथे महिला दिन विविध उपक्रमानी उत्साहात साजरा करण्यात आला. प्रारंभी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून पूजन करण्यात आले.उच्चशिक्षित माता व निपून भारत अंतर्गत लिडर माता यांचा सत्कार करून अनेक विद्यार्थी व महिलांनी कविता,गीतगायन व मनोगतातून नारी शक्तीचा गुणगौरव केला.प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना नवनियुक्त विज्ञान शिक्षिका मधुराणी शिंदे यांनी स्वानुभव सांगत यशस्वी होण्यासाठी अविरत कष्ट ,सहकार्य आणि संघर्ष करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केले.आप्पासाहेब देशमुख यांनी मार्गदर्शन करताना माता पालकांनी बालकांच्या स्वच्छता,आरोग्य व अभ्यासाकडे विशेष लक्ष देण्याची विनंती करुन निपुण भारत अभियान, बचत गट तसेच शासन व जिल्हा परिषद मार्फत महिला व बालकांच्या सक्षमीकरणासाठी चालू असलेल्या विविध योजनांची माहिती दिली.
यावेळी उपस्थित महिलांच्या पाक कला, उखाणे आणि संगीत खूर्ची अशा स्पर्धा घेऊन विजेत्या महिलांना बक्षीस वितरण करण्यात आले.याप्रसंगी मयुरी ढेरे,अनिता ढेरे,माधुरी पासले, विजयश्री पोतदार,सुषमा वाघमारे,अनिता वाघमारे ,रुपाली खांडेकर,सपना लंगर,अश्विनी ढेरे, जयश्री पोतदार,उषाबाई करंडे,आशा लकडे यांच्यासह मातापालक बहुसंख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अश्विनी मिटकरी,महादेवी पवार,ऐश्वर्या स्वामी,मुख्याध्यापक परमेश्वर गुंड यांनी परिश्रम घेतले. सुत्रसंचालन धनश्री वाघमारे व ईश्वरी ढेरे यांनी केले तर आभार समाधान थिटे यांनी मानले.
0 Comments