Hot Posts

6/recent/ticker-posts

शिवसेना राज्य ग्रंथालय सेलच्या जिल्हाध्यक्षपदी देविदास राठोड

 शिवसेना राज्य ग्रंथालय सेलच्या जिल्हाध्यक्षपदी देविदास राठोड 



अक्कलकोट (कटूसत्य वृत्त):- धावत्या युगात युवा पिढीही वेगवान झाली आहे. पुस्तके वाचण्यासाठी त्यांच्याकडे वेळच नसतो. किंबहुना त्यांचा वाचनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन निरस झाला आहे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना वाचनाचे महत्त्व पटवून देत वाचनाची गोडी लावणे गरजेचे आहे. शिक्षक, शाळा आणि ग्रंथालये यांनी यात पुढाकार घेत भावी पिढीला वाचनाची आवड लावली तरच ही वाचन संस्कृती टिकून राहील, असे प्रतिपादन सोलापूर शिवसेना जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष राठोड यांनी संवाद साधताना सांगितले. 
    शिवसेना राज्य ग्रंथालय सेलच्या अध्यक्षपदी अक्कलकोट तालुक्यातील जेऊरवाडी येथील जेष्ठ समाजसेवक देविदास राठोड यांची निवड करण्यात आली या निवडीचे पत्र शिर्डी येथे झालेल्या शिवसेना राज्य ग्रंथालय सेलच्या राज्यस्तरीय पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत राज्य अध्यक्ष बीजी देशमुख,शिवसेना सचिव संजय मोरे यांच्या हस्ते निवडीचे पत्र देण्यात आले.
   याप्रसंगी ग्रंथालय संघटनेचे तालुकाध्यक्ष शंकर माळी, ग्रंथालय सेलचे तालुकाध्यक्ष बिराप्पा पुजारी, पत्रकार स्वामीराव गायकवाड, पुंडलिक पांढरे, शिवराया प्रचंडे उपस्थित होते. शिवसेना राज्य ग्रंथालय सेलच्या सोलापूर जिल्हा अध्यक्षपदी देविदास राठोड यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरावर वरून कौतुक आणि शुभेच्छाचे वर्षाव होतं आहेत.

Reactions

Post a Comment

0 Comments