एकनाथ शिंदेच्या चेहर्यामुळेच महायुतीचे २३२ आमदार- किरण साळी
माढा (कटूसत्य वृत्त):- एकनाथ शिंदेच्या चेहर्यामुळेच महायुतीचे सगळे २३२ आमदार निवडुन आले आहेत.अस ठणकावून सांगत
राजकारण आकड्याचं गणित असतं आज ना उद्या एकनाथ शिंदेच राज्याचे मुख्यमंत्री होतील.असं मोठ वक्तव्य युवा सेनेचे मुख्य सचिव किरण साळी यांनी माढ्याच्या वाकाव मधील युवासेनेच्या मेळाव्यात केलंय.
प्रत्येक शिवसैनिक -व युवा सैनिकाच्या मनात एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री व्हायला पाहीजेत हे आहे.आणी ते भविष्यात नक्कीच मुख्यमंत्री होतील.याची खात्री आहे.
एकनाथ शिंदेनी राबवलेल्या लोककल्याणकारी योजनांमुळे अडीच वर्षात केलेल्या कामांच्या झपाट्यामुळे एकनाथ शिंदे च्या चेहर्यावरच महायुतीचे सगळे आमदार निवडुन आलेत.ते लवकरच मुख्यमंत्री होतील.
वाकाव ता. माढा येथे युवा विजय महाराष्ट्र दौऱ्याच्या निमित्ताने आयोजित मेळाव्यात बोलत होते.यावेळी शिवसेनेचे सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख प्रा.शिवाजीराव सावंत,माजी पं. स.सदस्य पृथ्वीराज सावंत, युवासेनेचे पश्चिम महाराष्ट्र विभागीय सचिव ऋतुराज क्षीरसागर, राज्य कार्यकारिणी सदस्य शिवाजी जाधव, सुजीत खुर्द, प्रियंका परांडे, सचिन कांबळे, युवासेना जिल्हाप्रमुख प्रियदर्शन साठे,उपप्रमुख बालाजी बागल, शिवसेनेचे माढा तालुकाप्रमुख मुन्ना साठे, वाकावचे सरपंच ऋतुराज सावंत,नगरसेवक अरविंद खरात आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी पुढे बोलताना किरण साळी म्हणाले की, ना. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने लाडकी बहीण, युवक कल्याण, एस. टी. बसमध्ये तिकिट सवलत या लोककल्याणकारी योजना राबवल्या. त्यांच्या चेहर्यामुळेच महायुतीचे २३२ आमदार निवडून आले आहेत.एकनाथ शिंदे हे पुन्हा राज्याचे मुख्यमंत्री बनतील.
सोलापूर विद्यापिठाची निवडणुक लढवुन विद्यापिठावर भगवा फडकवणार आहोत.युवा विजय महाराष्ट्र दौर्यात शिवसेनेची संघटनात्मक बांधणी,युवासेनेचा विस्तार,महाविद्यालयीन युनिट्स तयार करणे हे या दौऱ्याचे उद्दिष्ट आहे. 'घर तिथे शिवसैनिक, गाव तेथे शिवसेना' या संकल्पनेद्वारे गावोगावी शिवसेनेचे संघटन मजबूत करण्यात येणार आहे.
महाराष्ट्रातील नंबर १ची युवा संघटना म्हणून युवा सेना दिसेल.उबाठा चे अनेक पदाधिकारी शिवसेना युवा सेनेत प्रवेश करताहेत.विरोधकांना धक्का देण्याच तंत्र सुरुच राहील.सोलापूर जिल्हावर एकनाथ शिंदेचे विशेष लक्ष आहे.सोलापूर जिल्हात युवासेनेचा मोठा झंझावात आहे.युवा संघटन वाढवण्यासाठी युवा संकल्प मेळावे घेतले जाताहेत.काम करणार्याच्या पाठीमागे एकनाथ शिंदे कायम असतात.शिवाजीराव सावंतासह त्यांचे पुत्र ऋतुराज यांना येत्या काळात लवकरच एकनाथ शिंदे नक्कीच मोठी जबाबदारी देतील.
ऋतुराज क्षीरसागर यांनी प्रा.सावंत यांनी राबविलेल्या आरोग्याची वारी या उपक्रमाचे कौतुक करत, पूरग्रस्तांसाठी कोल्हापूर येथे १२ ट्रक चादरी व धान्य या मदतीचा ॠतज्ञतापूर्वक उल्लेख करत. सोलापूर जिल्ह्यात शहर मध्यची जागा आपल्याला मिळाली असती तर निवडून आली असती असे देखील विशेषपणे नमूद केले.
पृथ्वीराज सावंत यांनी प्रास्ताविकात दौर्याचा उद्देश स्पष्ट करत यापुढील काळात शिवसेनेचे जास्तीत जास्त जिल्हा परिषद सदस्य व ग्रामपंचायत सदस्य निवडून आणण्यासाठी संघटना वाढवायची आहे. ताकदीने व जोमाने निवडणूका लढवण्याचा निर्धार व्यक्त केला. यावेळी महावीर देशमुख,प्रियंका परांडे,सुजीत खुर्द, शिवाजी जाधव,मुन्ना साठे,धर्मराज मुकणे,अरविंद खरात,
यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजिंक्य काटे यांनी केले तर आभार सरपंच ऋतुराज सावंत यांनी मानले.
चौकट ) प्रा सावंतांना विधानपरिषद तर ऋतुराजला संघटनात्मक जबाबदारीची मागणी-
प्रा. शिवाजीराव सावंत यांच्यामुळे सोलापूर जिल्ह्यात प्रतिकूल परिस्थितीत शिवसेनेला ताकद मिळत आली असून शिवसेना जिंवत ठेवली.जिल्हात एकही सेनेचा आमदार नाही.सोलापूर शहर मध्यच्या जागेवरचा हक्क सोडला. त्यामुळे त्यांना विधानपरिषदेवर संधी द्यावी. युवासेनेचे संघटन मजबूत करण्यासाठी ऋतुराज सावंत यांना देखील मोठी जबाबदारी देण्याची आग्रही
मागणी शिवसेनेच्या पदाधिकार्यानी बोलताना मांडली.यावर किरण साळीनी नक्कीच एकनाथ शिंदेकडून न्याय मिळवून दिला जाईल अशी भुमीका बोलताना मांडली.
चौकट] भगवेमय वातावरण- युवा सेनेच्या वाकाव मधील मेळाव्याचे जंगी नियोजन सावंत परिवाराकडून
करण्यात आले होते.प्रवेशद्वारापासून ते मेळाव्याच्या ठिकाणा पर्यत भगवे ध्वंज लावले होते तसेच प्रत्येक शिवसैनिक,युवा सैनिकांचा भगवा फेटा घालुन स्वागत केले जात होते.यामुळे भगवेमय वातावरण आणी शिवसैनिकांमध्ये मेळाव्याच्या ठिकाणी उत्साहाचे वातावरण संचारले होते.
0 Comments