नातेपुते पोलीस ठाणे येथे महारक्तदान शिबिरा मध्ये ९०३ रक्तदात्यांनी केले रक्तदान
नातेपुते (कटूसत्य वृत्त):- सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून व अप्पर पोलीस अध्यक्षक प्रीतम यावलकर अकलूज उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली नातेपुते पोलीस ठाणे येथे नातेपुते पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महारुद्र परजणे यांनी एक थेंब रक्ताचा फुलवितो अंकुर जीवनाचा हे ब्रीदवाक्य घेऊन नातेपुते पोलीस ठाणे येथे महारक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. नातेपुते येथील ज्ञानदीप ब्लड बँक यांनी रक्त संकलन करून घेण्यासाठी ५० कॉटची व्यवस्था करून ५५ प्रशिक्षित सुसज्ज स्टाफ व डॉक्टर या ठिकाणी नेमले होते. रक्तदान करण्यासाठी नातेपुते व नातेपुते परिसरातील ३१ गावातील लोकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला होता. यामध्ये सामाजिक संस्था, पत्रकार, गणेशोत्सव, नवरात्र उत्सव मंडळाचे पदाधिकारी, आर्ट ऑफ लिविंग चे पदाधिकारी तसेच नातेपुते येथील तृतीयपंथी लोक, ग्रामीण भागातील महिला मजूर वर्ग, शेतकरी वर्ग अशा अनेक विविध जाती धर्माच्या लोकांनी रक्तदान एक श्रेष्ठ दान असे म्हणत मोठ्या प्रमाणात रक्तदान केले. तसेच अकलूज उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांनी रक्तदान शिबिरास भेट दिली असता त्यांनी स्वतः या रक्तदान शिबिरात रक्तदान केले. सकाळी ९ वाजता सुरू करण्यात आलेले रक्तदान शिबिर रात्री ८ वा.४५ मिनिटापर्यंत सुरू होते.महारक्तदान शिबिरामध्ये ९०३ लोकांनी रक्तदान केले. रक्तदात्यांसाठी अल्पोपराची सोय करण्यात आली होती. रक्तदान शिबिर पार पाडण्यासाठी सपोनी महारुद्र परजणे, पी.एस.आय. विक्रांत दिघे, पीएसआय धनाजी ओमासे, पोलीस ठाणे कर्मचारी स्टाफ, होमगार्ड पथकातील कर्मचारी, पोलीस पाटील यांनी परिश्रम घेतले. महारक्तदान शिबिरामध्ये रक्तदात्यांनी रक्तदान करून हा उपक्रम यशस्वी केल्याबद्दल सर्व रक्तदात्यांचे नातेपुते पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महारुद्र परजणे यांनी पोलीस ठाणे तर्फे हार्दिक आभार मानले.
0 Comments