मुख्याध्यापक अनिल झोळ यांचा सेवानिवृत्ती निमित्त सत्कार
वाशिंबे (कटूसत्य वृत्त):- राजुरी ता.करमाळा येथील राजेश्वर विद्यालयाचे मुख्याध्यापक अनिल सोपान झोळ यांचा सेवानिवृत्ती निमित्त विद्यालयात गुरूवारी दि. २७ रोजी सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
मान्यवरांच्या हस्ते क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.अध्यक्षस्थानी संस्थापक सचिव लालासाहेब जगताप होते. मुख्याध्यापक अनिल झोळ यांचा सपत्नीक सत्कार वैजनाथ स्वामी शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने करण्यात आला. यावेळी लालासाहेब जगताप यांनी आपले मनोगत व्यक्त करताना मुख्याध्यापक झोळ यांच्या सुरूवातीपासून ते सेवानिवृत्ती पर्यंत चा खडतर परिश्रमातून केलेल्या वाटचालीत उजाळा देत त्यांच्या सेवेबद्दल गौरवउद्गार व्यक्त करत शुभेच्छा दिल्या. झोळ यांनी सन १९८९ ते २०२५ अशी एकुण ३६ वर्ष सेवा दिली. यामध्ये ३० वर्षे सहशिक्षक व ६ वर्षे मुख्याध्यापक म्हणून काम केले.
कार्यक्रमासाठी कृषी अधिकारी देविदास सारंगकर,प्रा.संजय चौधरी, गंगाराम वाघमोडे,शरदचंद्रजी पवार विद्यालय वाशिंबे मुख्याध्यापक रमेश यादव व सर्व शिक्षकवर्ग,राजूरी,मांजरगाव, येथील माजी विद्यार्थी व पंचक्रोशीतील मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक धनंजय साखरे यांनी केले.तर आभार मारुती साखरे यांनी मानले.
____चौकट___
अमेरिका येथे उच्चपदावर कार्यरत असलेले शाळेचे माजी विद्यार्थी संतोष सारंगकर यांनी मुख्याध्यापक झोळ यांना भ्रमणध्वनीवरुन शुभेच्छा दिल्या. झोळ व शाळेतील अन्य शिक्षकांना त्यांनी भेटवस्तूही पाठवल्या .तर विद्यार्थ्यांसाठी १ लाख २० हजार किमतीची ४० बाकडेही सारंगकर यांनी शाळेस भेट दिली आहे.
0 Comments