महिलांनी घरच्या जबबादाऱ्या पार पाडत स्वतःसाठी पण जगावं- प्रिया मेहेरकर
कोंडी (कटूसत्य वृत्त):- जिजाऊ ज्ञानमंदिर इंग्लिश मिडियम स्कूल, कोंडी येथे महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी प्रथम माता जिजाऊ, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.याकार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून कीर्तनकार मीराताई बोगे, प्रियाताई मेहेरकर, समाजसेवक संतोष नीळ,प्राचार्या सुषमा नीळ, मुख्याध्यापक वैभव मसलकर, अर्चना औराद, उपस्थित होते.
यावेळी महिलांचे विविध खेळ घेण्यात आले. त्यात बुक बॅलेन्स, फुगे फोडणे, संगीत खुर्ची अशा खेळातून महिलांना पुन्हा बालपण जगायला मिळालं. यात फुगा फोडणे या खेळात प्रथम क्रमांक शीतल शिंदे, द्वितीय क्रमांक सुप्रिया माळी, तृतीय क्रमांक मोहिनी राऊत यांनी मिळवला. संगीत खुर्ची मध्ये अनुक्रमे अनीता भोसले, साधना विश्वकर्मा, रूपाली भोसले यांनी मिळवला . बुक बॅलेन्स यात अनुक्रमे वैशाली शिंदे, कोमल बोबडे, अर्चना परबत यांनी पटकवला.तसेच प्रशालेतील विद्यार्थ्यांच्या मातांना 'आदर्श गुणवंत माता' या पुरस्कारांने गौरवण्यात आले. यात शाकिरा मुलाणी, सोनाली शिंगारे, शिल्पा जाधव, बबिता चव्हाण यांना सन्मान चिन्ह, शाल, पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. खेळात विजयी झालेल्या स्पर्धेकांना ही भेटवस्तू देण्यात आले.
यावेळी 'एक मूठ धान्य समाजसेवेसाठी' ही संकल्पना राबवण्यात आली. यात सर्व महिला, विद्यार्थी, शिक्षक यांनी सहभागी होण्याचे आश्वासन दिले.महिलांना अंतरंग व बाह्यरंगाने कसे सुंदर बनवता येईल याविषयी प्रिया मेहेरकर यांनी मार्गदर्शन केले. तसेच मीराताई बोंगे यांनी व्यावहारिक उदाहरणातुन महिलाना मार्गदर्शन केले.
याकार्यक्रमाचे सुत्रसंचलन शीतल कांबळे यांनी केले तर आभारप्रदर्शन महादेवी माने यांनी केले.
0 Comments