अनगर (कटूसत्य वृत्त):- धनगर येथील काय शंकरा बाजीराव पाटील माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय 8 मार्च हा जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्राचार्य चंद्रकांत ढोले हे होते तर प्रमुख पाहुण्या म्हणून निवृत्त शिक्षिका शकुंतला काळे या होत्या.
स्त्री जन्म देते पालन पोषण करते व उद्धारिते तिने जगातील सर्व क्षेत्रे पादाक्रांत केली आहेत ती सहनशील आणि सोशिक आहे तिच्या असण्याने हे जग सुंदर झाले आहे असे मत व्यक्त केले.
यावेळी अध्यक्ष स्थानावरून प्राचार्य चंद्रकांत ढोले यांनीही सर्व महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी सर्व महिला शिक्षकांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी प्राचार्य चंद्रकांत ढोले, उपप्राचार्य महादेव चोपडे, पर्यवेक्षक माधव खरात, अनुराधा गोडसे, माधवी पाचपुंड, उज्वला घोलप, रंजना सरक, अल्मास बागवान, अर्चना गुंड, अनुपमा निरगिडे, चंद्रकला उघडे, ज्योती भडकवाड, सपना झुरळे, पुनम गुंड, रेश्मा गुंड, प्राजक्ता देंडे, रंजना उंबरे, गीतांजली माळी, अनिता वाघमारे, कदम मॅडम आदी उपस्थित होते सत्यवान दाढे यांनी सूत्रसंचालन केले तर माधव खरात यांनी आभार मानले.
0 Comments