Hot Posts

6/recent/ticker-posts

विश्वतेजसिंह मोहिते पाटील यांचा शाही विवाह सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न

 विश्वतेजसिंह मोहिते पाटील यांचा शाही विवाह सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न




अकलूज (कटूसत्य वृत्त):- महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे नातू तर आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांचे चिरंजीव विश्वतेजसिंह व चिखली जि.वाशिम येथील श्री उदयसिंह सरनाईक यांची कन्या शीवांशिका यांचा शनिवार दि. ८ मार्च रोजी शाही विवाह सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.या  सोहळ्यास महाराष्ट्रासह देशभरातील, विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. गोरज मुहूर्तावर लाखोंहून अधिक निमंत्रित, मित्र परिवार,पाहुणे यांनी वधूवरास शुभाशीर्वाद देत, सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांच्या परिवारातील चौथ्या पिढीचा शाही विवाह सोहळा पाहिला.
या विवाह सोहळ्यास खा. शरदचंद्र पवार, सौ. प्रतिभा पवार, ना रामदास आठवले,ना. शिवेंद्रराजे भोसले, ना. शंभूराज देसाई, सौ. स्मिता देसाई, खा. उदयनराजे भोसले, कल्पनाराजे भोसले सातारा, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विश्वजीतराजे नाईक निबाळकर, विश्वजीत कदम, सौ. स्वप्नाली कदम, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आ.किरण सरनाईक, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, खा. शाहू महाराज छत्रपती, खा. निलेश लंक, खा. बजरंग सोनवणे, संजीवराजे नाईक निंबाळकर, सौ. शिवांजलीराजे नाईक निंबाळकर, श्रीनिवास पवार, सौ. शर्मिला पवार, क्रीडा व युवक कल्याण मंत्री ना दत्तात्रय भरणे, आ. दिलीप सोपल, आ. नारायण पाटील, आ. उत्तम जानकर, आ.समाधान आवताडे, आ. सचिन कल्याणशेट्टी, आ. अभिजीत पाटील, आ.राजू खरे, माजी आ. दिलीप माने, दीपक साळुंखे, धनाजी साठे, सिध्दाराम म्हेत्रे, प्रशांत परिचारक, प्रकाश पाटील (पानीव), कल्याणराव काळे यांच्यासह विविध राजकीय पक्षाचे नेते, सहकार, शिक्षण, उद्योग, सामाजिक, नाट्य, चित्रपट क्षेत्रातील असंख्य मान्यवर या विवाह सोहळ्यास उपस्थित होते. राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, आ. रणजितसिंह मोहिते पाटील, खा. धैर्यशील मोहिते पाटील यांच्यासह परिवारातील सदस्यांनी उपस्थितांचे स्वागत केले.
Reactions

Post a Comment

0 Comments