आ. सचिन कल्याणशेट्टी यांची बाळराजे पाटील यांनी घेतली भेट
यापूर्वी असलेला महायुती घटक पक्षातील अंतर्गत समन्वय वृध्दींगत करून संपूर्ण जिल्ह्यातील मूलभूत सोयी सुविधांसाठी शासनस्तरावर पाठपुरावा करून सर्वसामान्यांमध्ये राज्य शासनाच्या लोकाभिमुख निर्णयाबाबत सकारात्मकता वाढवण्यासाठी लोकप्रतिनिधी या नात्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही महायुतीचे सर्व आमदार प्रयत्न शील आहोत. ना. राजन पाटील यांनी महायुतीच्या माध्यमातून शासन स्तरावर पाठपुरावा करत अनेक महत्त्वपूर्ण योजनांसाठी हजार कोटींचा निधी खेचून आणला आहे. या पुढील काळातही मोहोळसह संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातील विकासाभिमुख वाटचालीसाठी तसेच निश्चितपणे सहकार्य करण्याचे अभिवचन यावेळी जिल्हाध्यक्ष आ. कल्याणशेट्टी यांनी बाळराजे पाटील यांच्याशी बोलताना दिले.
यावेळी आ. कल्याणशेट्टी यांनी माजी आमदार राजन पाटील यांच्यासह परिवारातील सर्व ज्येष्ठ सदस्यांच्या प्रकृतीची आपुलकीने विचारपूस केली. गेल्या दोन दशकापासून पाटील आणि कल्याणशेट्टी परिवारातील स्नेह कायम असल्याची बाब अधोरेखित करत त्यांनी गत सत्ता कालावधीत मंजूर झालेल्या विकासकामांच्या वाटचालीचा विस्तृत आढावा घेतला. यावेळी त्यांच्या समवेत राष्ट्रवादीचे शशिकांत पाटील उपस्थित होते.
चौकट 1
आमदार सचिन
कल्याणशेट्टी हे एक कार्यक्षम
आमदार असण्याबरोबर कुशल पक्षसंघटक आहेत. गेल्या अनेक वर्षापासूनचा आमचा आणि त्यांच्या परिवाराचा आपुलकीचा स्नेहबंध आजही कायम आहे. अक्कलकोट येथील त्यांच्या निवासस्थानी झालेल्या भेटी दरम्यान राजकीय क्षेत्राबरोबर अनेक क्षेत्रातील विविध महत्त्वपूर्ण विषयांवर त्यांच्याकडून मौलिक मार्गदर्शन प्राप्त झाले. या पुढील काळातही मोहोळ मतदारसंघातील विकासात्मक वाटचालीबाबत सातत्याने सहकार्याची भूमिका कायम ठेवण्याचे अभिवचन या भेटी दरम्यान त्यांनी दिले.
- बाळराजे पाटील,
चेअरमन लोकनेते शुगर
0 Comments