स्व.नागेश करजगी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ ऑर्किड स्कुलमध्ये नेत्र तपासणी शिबीर संपन्न
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर शहरातील नागेश करजगी ऑर्किड स्कुलमध्ये संस्थेचे प्रेरणास्थान स्व.नागेश करजगी यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबीर आयोजित करण्यात आले होते.
या शिबिराचे उदघाटन संस्थेचे अध्यक्ष डॉ.कुमार करजगी यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी संस्थेचे विश्वस्त नंदिनी करजगी, सोमनाथ करजगी, राजेश करजगी, संस्थेच्या सचिवा वर्षाताई विभुते, व्यवस्थापक अक्षय चिडगुंपी, प्राचार्या रुपाली हजारे, प्रि.प्रायमरी इन्चार्ज अनिता अनगोंडा, डॉ.गौस मुजावर, डॉ.मंजिरी पाटील, डॉ.आशिष चौधरी उपस्थित होते.
सदर शिबिरामध्ये पुणे येथील एच. व्ही देसाई रुग्णालयाच्या तज्ञ डॉक्टर्सनी शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी केली. तसेच सोलापूर शहरातील नागरिक या शिबिरात मोठ्या प्रमाणात आले होते. त्यांची देखील नेत्र तपासणी करण्यात आली. शिबिरातील गरजू रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी पुणे येथे पाठविण्यात येणार आहे. या शिबिरात जवळपास ५०० हुन अधिक नागरिकांनी भेट देऊन शिबीराचा लाभ घेतला.सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
0 Comments