एक बाटली पाणी, झाडासाठी उपक्रमाचा महापालिकेत शुभारंभ
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- पर्यावरणाचे संरक्षण आणि संवर्धन ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कडक उन्हात शहरातील झाडे जगवण्यासाठी नागरिकांनी स्वयंप्रेरणेने 'एक बाटली पाणी, झाडासाठी...' या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी केले.
महापालिका आवारात असलेल्या बागेतील झाडांना आयुक्त ओम्बासे आणि परसबाग सोलापूरचे मुख्य प्रवर्तक नारायण पाटील यांच्या हस्ते बाटलीने पाणी घालून एक बाटली पाणी झाडासाठी या उपक्रमाचा शुभारंभ केला.
माझी वसुंधरा अभियान, सोलापूर महापालिका आणि परसबाग सोलापूर यांचा हा संयुक्त उपक्रम होता. शहरात वृक्षारोपण केलेल्या रोपांना लोकसहभागातून नियमितपणे पाणी मिळावे व त्याचे संवर्धन व्हावे तसेच या संदर्भात मोठ्या प्रमाणात जनजागृती व्हावी या हेतूने हा उपक्रम हाती घेण्यात आला होता. परसबागचे प्रतिनिधी शिरीष गोळवलकर यांनी स्वागत केले. पाटील यांनी या उपक्रमाची माहिती दिली. डॉ. भारत मुळे यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमास अतिरिक्त आयुक्त रवी पवार, उपायुक्त तैमूर मुलाणी, सहायक आयुक्त शशिकांत भोसले, पर्यावरण संवर्धन अधिकारी अक्षय मोरे, जनसंपर्क अधिकारी गणेश बिराजदार, पर्यावरण अधिकारी स्वप्निल सोलनकर, परसबागच्या सहप्रवर्तिका शुभदा पाटील, स्मिता देशपांडे, पवन देसाई, प्रकाश कुलकर्णी, विजयानंद स्वामी, डॉ. सर्जेराव दौलतोडे, श्रीशैल स्वामी, सुप्रिया जक्कल, मनोज देवकर, काशीनाथ भतगुणगी, अनिल मुतालिक देसाई, अविनाश बेंजरपे, महेंद्र आठवले, सुप्रिया ठाणे, अनिता कोळी, स्नेहश्री देसाई उपस्थित होते.
0 Comments