नातेपुते येथील अक्षय शिक्षण संस्थेत मुलींना कराटेचे प्रशिक्षण
नातेपुते (कटूसत्य वृत्त):- मुलींनी गुड टच आणि बॅड टच काय आहे हे ओळखता आले पाहिजे, आलेल्या संकटांना तोंड देण्यासाठी स्वतःचा बचाव कसा करता येईल यासंबंधी कराटे प्रशिक्षक सविता राऊत यांनी मुलींना कराटे प्रशिक्षणातून सेल्फ डिफेन्सचे प्रशिक्षण दिले. महिला व बालकल्याण विभाग व जिल्हा क्रीडा कार्यालय सोलापूर च्या माध्यमातून मुलींमध्ये सुरक्षितता जाणीव जागृती निर्माण होण्याच्या दृष्टिकोनातून तसेच स्वतःचे संरक्षण करता यावे स्वतःमध्ये आत्मविश्वास वाढवा या उद्देशाने नातेपुते येथील अक्षय शिक्षण संस्था संचलित चंद्रकांत घुगरदरे प्रशाला व ज्युनिअर कॉलेजच्या मुलींना सेल्फ डिफेन्स कराटे प्रशिक्षण कराटे प्रशिक्षक सविता राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली देण्यात आले. मुलींना कराटे पंच, फेस ब्लॉक, अनेक वेगवेगळे कराटेचे प्रकार शिकविण्यात आले तसेच इतरांपासून स्वतःचा बचाव कसा करता येईल याचे प्रशिक्षण दिले. शाळेचे मुख्याध्यापक रवींद्र चांगण, शारीरिक शिक्षण विभागाचे शिक्षक सुनील गोरे यांनी प्रशिक्षण यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सहकार्य केले सदर घेण्यात आलेल्या प्रशिक्षणामुळे मुलींमध्ये आत्मविश्वास वाढल्याचे मत मुख्याध्यापक रवींद्र चांगण यांनी व्यक्त केले.
0 Comments