स्त्रियांचा सन्मान अखंड रहावा-तहसीलदार शिल्पा ठोकडे
टेंभूर्णी (कटूसत्य वृत्त):-अकोले खुर्द ता. माढा येथील गणपती फार्मसी म हाविद्यालयात जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन व दीप प्रज्वलाने ने झाली. महिला दिनानिमित्त महाविद्यालयात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये रांगोळी स्पर्धा, निबंध स्पर्धा,ड्रॉईंग स्पर्धा आशा विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी महिला दिनाचे औचित्य साधून करमाळा तहसीलदार शिल्पा ठोकडे यांनी त्यांच्या भाषणात म्हणाल्या की तुमचे वेगळेपण स्वीकारा आणि तुमची शक्ती चमकू द्या. लक्षात ठेवा, तुमच्या स्वप्नांना कोणतीही सीमा नसते आणि तुमच्याकडे जगाला पुन्हा परिभाषित करण्याची शक्ती आहे यातूनच स्त्रियांचा सन्मान अखंड रहावा.एक स्त्री म्हणजे अडथळ्यावर मात आहे असे श्रीमती प्रमोदिनी लांडगे यांनी सांगून आपले मनोगत व्यक्त केले.तसेच आपल्या भाषणातून महिला सन्मानाचे महत्त्व पटवून सरपंच रुपालीताई नवले यांनी महिला आरक्षण याबतीत सर्वांना महत्त्व सांगितले.
महाविद्यालयातील विद्यार्थिनीनी आपल्या निबंधातून
व स्पर्धेमध्ये प्रतिक्षा माने , कृतिका वैद्य,वृषाली राऊत,दिपाली सुळे,अनिकेत गायकवाड, यांनी सहभाग नोंदवला तसेच महिला दिनानिमित्त प्रमोदिनी लांडगे,रुपालीताई नवले व प्राचार्या डॉ.रुपाली बेंडगुडे यांनी विद्यार्थिनींना महिला सुरक्षा व महिला सक्षमीकरण विषयी माहिती दिली. याप्रसंगी महाविद्यालयाच्या सर्व शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. तसेच कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून प्रा. प्रियांका खडसरे व प्रा. रूपाली राऊत यांनी कार्य केले.
0 Comments