कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ५० लाख रुपयांची कांदापट्टी गेल्या तीन महिन्यांपासून थकविली
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काही अडत्यांनी शेतकऱ्यांची सुमारे ५० लाख रुपयांची कांदापट्टी गेल्या तीन महिन्यांपासून थकविली आहे.त्यांनी दिलेले धनादेश वटत नसल्याने शेतकरी दररोज संबंधित अडत्यांकडे हेलपाटे मारूनही पैसे मिळत नसल्याने शेतकऱ्यां मधून संताप व्यक्त होत आहे.महाराष्ट्रात नाशिक जिल्ह्यातील लासलगाव आणि सोलापूरची कृषी उत्पन्न बाजार
समिती कांदा लिलावासाठी देशात प्रसिध्द आहे. येथे महाराष्ट्र आणि कर्नाटकातील शेतकरी मोठ्या संख्येने कांदा लिलावासाठी घेऊन येतात. नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये कांद्याचा लिलाव मोठ्या प्रमाणात चालतो. त्यातून दररोज कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते.येथील काही अडत्यांकडे शेतकरी डिसेंबरमध्ये लिलावासाठी घेऊन आले होते. लिलाव झाल्यानंतर अडत्यांनी शेतकऱ्यांना १५ दिवसानंतरचे धनादेश दिले होते. शेतकऱ्यांनी धनादेश बँकांमध्ये भरल्यानंतर ते न वटता परत आले. त्यानंतर या शेतकऱ्यांनी संबंधित अडत्यांच्या भेटी घेऊन कांदापट्टीची मागणी केली. परंतु तारखांवर तारखा सांगून त्यांनी वेळ मारून नेली. याबाबत या शेतकऱ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीकडे लेखी तक्रारी नोंदविल्या तरीही शेतकऱ्यांना बाजार समितीने अद्यापपर्यंत कांद्याची पट्टी मिळवून चार कोटींची वसुली गेल्या दोन वर्षांत काही अडत्यांनी शेतकऱ्यांची सुमारे चार कोटी रुपयांची कांदापट्टी थकविली होती. त्या अडत्यांकडे वारंवार पाठपुरावा करून व त्यांच्यावर कारवाई करून शेतकऱ्यांची चार कोटी रुपयांची बिले वसूल करून दिली असल्याची माहिती कांदा विभागाचे प्रमुख नामदेव शेजाळ यांनी दिली. दिली नाही.कुसूर, दक्षिण सोलापूर तालुक्यातील तेलगाव, अंत्रोळी, वडापूर, विंचूर आदी भागातील या शेतकऱ्यांची कांदापट्टी थकली आहेत. त्यांनी कांदा विभागाचे प्रमुख नामदेव शेजाळे यांची भेट घेऊन मंगळवारी लेखी तक्रार दिली. तेव्हा त्यांनी लवकरच या शेतकऱ्यांना त्यांची बिले मिळवून देऊ, असे आश्वासन दिले.
चौकट
शेतकऱ्यांची बिले मिळवून देऊ
कांदापट्टी थकविलेल्या अडत्यांची माहिती प्राप्त करून संबंधित शेतकऱ्यांना त्यांची बिले मिळवून देऊ. ज्या अडत्यांनी कांदा उत्पादकांची बिले थकविली आहेत त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल.डॉ. प्रगती बागल, प्रशासक, बाजार समिती
दोन दिवसात टाळे ठोकणार
सुरेश चन्नप्पा उपासे या अडत्याने शेतकऱ्यांची कांदापट्टी थकविल्याच्या तक्रारी आल्या आहेत. या अगोदर त्यांना सूचना देऊन शेतकऱ्यांची बिले देण्याबाबत नोटीस दिली आहे. येत्या दोन दिवसांत कांदापट्टी दिली नाही तर त्यांच्या गाळ्यास टाळे ठोकून कांदा लिलावाचा परवाना निलंबित करू.नामदेव शेजाळे, कांदा विभाग प्रमुख
0 Comments