संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजनेच्या निधी वितरणात विलंब लाभार्थ्यांचे हाल- सुदीप चाकोते - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, March 5, 2025

संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजनेच्या निधी वितरणात विलंब लाभार्थ्यांचे हाल- सुदीप चाकोते

 संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजनेच्या निधी वितरणात विलंब लाभार्थ्यांचे हाल- सुदीप चाकोते


सोलापूर (कटूसत्य वृत्त):- संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेच्या निधी वितरणात होणाऱ्या विलंबामुळे अनेक लाभार्थ्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. वृद्ध, विधवा, अपंग आणि निराधार नागरिकांचे जीवन या अनुदानावर अवलंबून असल्याने वेळेवर निधी न मिळाल्यास त्यांचे जगणे कठीण होत आहे. राज्य सरकारकडून नियमित स्वरूपात निधी मिळणे अपेक्षित असताना वेळोवेळी होणाऱ्या विलंबामुळे लाभार्थ्यांमध्ये नाराजी आहे.

संबंधित अधिकाऱ्यांनी त्वरित दखल घेऊन निधी वितरण वेळेवर होण्यासाठी आवश्यक पावले उचलावीत, अशी मागणी सुदीप चाकोते प्रदेशाध्यक्ष काँग्रेस सेवा दल यंग ब्रिगेड व योजनेचे लाभार्थी यांनी या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन, तातडीने कारवाईची मागणी केली  आहे. प्रसंगी सोशल मीडिया पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संजय कुराडे, मल्लिकार्जुन सोलापुरे, नूरअहमद नालवार, चंद्रकांत टिक्के, यश माशाळे, श्रीकांत दासरी आकाश तिपरादी अक्षय बिराजदार पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages