किरण स्पोर्ट्स क्लबने पुरुष व महिला या दोन्ही गटात विजेतेपद पटकावले - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, March 5, 2025

किरण स्पोर्ट्स क्लबने पुरुष व महिला या दोन्ही गटात विजेतेपद पटकावले

किरण स्पोर्ट्स क्लबने पुरुष व महिला या दोन्ही गटात विजेतेपद पटकावले


सोलापूर (कटूसत्य वृत्त):- पुरुष व महिला गट जिल्हा अजिंक्यपद व निवड चाचणी खो खो स्पर्धेत किरण स्पोर्ट्स क्लबने पुरुष व महिला या दोन्ही गटात विजेतेपद पटकावीत दुहेरी संपादला. ह. दे. प्रशालेच्या मैदानावर झालेल्या या स्पर्धे ची पारितोषिके सहाय्यक पोलीस निरीक्षक शितलकुमार  गायकवाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित लकडे, विजापूर रोड मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाचे विश्वस्थ रेवणसिद्ध बिज्जरगी, सिद्धाराया होर्टीकर, विजय शाबादी व निवृत्त तालुका क्रीडाधिकारी सत्येन जाधव यांच्या हस्ते देण्यात आली. विजयी संघाचे सोलापूर अॅम्युचर खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष महेश गादेकर यांनी अभिनंदन केले. पुरुष संघासाठी कै. राजेश विजय शाबादी यांच्या स्मरणार्थ शाबादी परिवारातर्फे तर महिलांसाठी विजापूर रोड मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळ विश्वस्थ रेवणसिद्ध बिज्जरगी व गणेश कोळी यांच्यातर्फे फिरता करंडक व सोलापूर शहर पोलीस संघातर्फे प्रथम, द्वितीय व तृतीय संघासाठी करंडक व सर्वोत्कृष्ट अष्टपैलू आक्रमक व संरक्षक या खेळाडूंसाठी ट्रॉफ्या देण्यात आल्या.


एन आर पाटील डेव्हलपर्स चे अध्यक्ष नामदेव पाटील यांनी ग्राउंड वरती जाऊन यांनी दोन्ही संघाचे कौतुक केले व त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या काही अडचणी असेलतर त्या मी दूर करतो हा शब्द दिला.

या स्पर्धेसाठी स्वामी विवेकानंद प्रशालेचे प्राचार्य तथा किरण स्पोर्टस क्लबचे अध्यक्ष अंबादास पांढरे  ,सचिव मोहन रजपुत  खजिनदार श्रीकृष्ण कोळी  ,सदस्य  अर्जुन पवार , सिद्धाराम बिराजदार आदि उपस्थित होते 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages