Hot Posts

6/recent/ticker-posts

अन्यथा आमदारांना तालुक्यात फिरु देणार नाही- मुन्ना साठे

अन्यथा आमदारांना तालुक्यात फिरु देणार नाही- मुन्ना साठे 


माढा (कटूसत्य वृत्त):- साडेतीन हजार रुपये ऊसाला पहिली उचल  देणार असल्याची जाहीर  घोषणा करुन  माढा विधानसभेची निवडणूक ३० हजाराने जिंकलेल्या  आमदार अभिजित पाटील यांनी कारखान्याचा  गाळप हंगाम बंद झाल्यानंतर देखील ऊसाला जाहीर केलेला दर न देता शेतकऱ्यांची घोर  फसवणूक केली आहे.

जाहीर केलेला दर येत्या आठ दिवसांत न दिल्यास त्यांना माढा तालुक्यात फिरु देणार नसल्याचा गर्भित   इशारा देऊन  देशाचे नेते शरद पवारांकडे या संदर्भात तक्रार करणार असल्याचे शिवसेना शिंदे गटाचे माढा तालुका प्रमुख मुन्ना साठे यांनी  दिला आहे.

ऊस दराच्या मुद्यावरुन मतदार संघातील कोणत्याही कारखानदारांनी भुमिका मांडली नसुन शिवसेनेचे तालुका प्रमुख मुन्ना साठेकडे ऊस उत्पादक  शेतकर्यानी व्यथा मांडल्यानंतर साठेनी आक्रमक पवित्रा घेऊन या प्रश्नाला वाचा फोडली आहे.

या संदर्भात मुन्ना साठेनी पत्रकार परिषद घेऊन  स्पष्ट भुमिका मांडली आहे.
माढा लोकसभा मतदारसंघातून यापूर्वी खा. शरद पवार यांनी निवडणूक लढवली होती. त्यांनी त्यावेळी माढ्याची बारामती करु असे आश्वासन दिले होते. त्याच पध्दतीने त्यांच्याच पक्षाचे स्वतःला धपकाकिंग म्हणवून घेणारे आ.अभिजित पाटील यांनी ऊसाला प्रतिटन साडेतीन हजार रुपयांच्या दराची घोषणा केली होती. त्या आश्वासनासंदर्भात न बोलता त्यांच्या कारखान्याने ऊस उत्पादक शेतकर्यांपैकी काहींना २८०० रुपयांचा व काहींना २००० रुपयांचा ॲडव्हांस दिला आहे. आमदारांनी याबाबत खुलासा  करुन आश्वासनाची पुर्तता करावी.महिला दिनाच्या निमित्ताने आमदार कार्यक्रम राबवितात पण महिलांनी श्रम करून पिकवलेला ऊसदराच्या मुद्द्यावर काही बोलत नाहीत.
निवडणूकीत शेतकऱ्यांचा ऊस गाळपाबाबतही ते म्हणाले होते की माझा कारखाना दहा हजार गाळप क्षमतेचा आहे. माढा तालुक्यात तीनशे वहाने देतो पण प्रत्यक्षात तीस वाहनेही दिली गेली नाहीत.ही शेतकऱ्यांची फसवणूक आहे.माढा मतदार संघात आमदार अभिजीत पाटील विरुध्द शिवसेना शिंदे गट असा राजकीय सामना येत्या काळात  पहायला मिळणार आहे.यावर आ. अभिजीत पाटील काय भुमिका मांडतात हे  पहावं लागणार आहे.



चौकट) 
सीनेकाठी व माढा भागात शेतीसाठी फक्त दोन तीन तास वीज  उपलब्ध होते आहे. वीजेचे नियोजन आमदार चुकवत आहेत.यातून सरकारची बदनामी होते. विरोधी पक्षाचे आमदार असल्याने ते जाणीवपूर्वक वीजेच्या बाबतीत चुकीची भूमिका घेऊन सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत.


चौकट) 
 आमसभा ही "आम" खाण्यासाठीच-
माढ्यात झालेल्या आमसभेवर टीका करताना मुन्ना साठे  म्हणाले की प्रशासनाला धारेवर धरत आमसभेत अधिकाऱ्यांकडून "आम "खाता यावेत म्हणून सभेचे आयोजन केले गेले होते.असा आरोप देखील साठेनी केलाय.आमसभेत उपस्थित झालेले नागरिकांचे किती प्रश्न सुटले याचा शोध घ्यावा लागेल.


चौकट) 
कारखानदार -विरोधक शांतच;तालुका प्रमुख आक्रमक-माढा मतदार संघाची आमदार अभिजीत पाटलांच्या विरोधात निवडणुक लढवलेले रणजितसिंह शिंदे,असोत अथवा त्यांचे वडिल माजी आ.बबनराव शिंदे यांचेसह माजी आमदार धनाजीराव साठे,भैरवनाथ शुगरचे अध्यक्ष प्रा.शिवाजीराव सावंत,अजित पवार गटाकडून निवडणुक लढवलेल्या मीनल साठे यांचेसह मतदार संघातील  अन्य मातब्बर विरोधक ऊस दराच्या मुद्यावरुन शांतच आहेत.तर दुसरीकडे मात्र शिवसेनेचे तालुकाप्रमुख मुन्ना साठे हे सगळ्या मंडळीना भारी ठरले असून शेतकर्याचा प्रश्न त्यांनी उपस्थित करुन आवाज उठवलाय.

Reactions

Post a Comment

0 Comments