दूध संघाचे संचालक मंडळ बरखास्त प्रशासक मंडळ नियुक्त;
अध्यक्षपदी पांढरे तर डॉ. साळवे, वडतिले सदस्य
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- कामकाजात अनियमितता,कारभार मनमानी, नियमवाह्य
करून संस्थेच्या व सभासदांच्या हिताला वाधा आणल्याप्रकरणी सोलापूर जिल्हा दूध उत्पादक
व प्रक्रिया संघाचे (दूध पंढरी) संचालक मंडळ वरखास्त करून तीन सदस्यीय प्रशासक मंडळ
नियुक्त करण्याचा आदेश विभागीय दुग्ध उपनिबंधक राजकुमार पाटील यांनी दिला आहे. या आदेशाने दूध संघाच्या संचालक मंडळात एकच खळवळ उडाली आहे.तीन सदस्यीय प्रशासक मंडळात जिल्हा (दुग्ध) श्रीनिवास पांढरे हे अध्यक्ष तर सहकारी संस्थांच्या सहायक निबंधक डॉ. वैशाली साळवे व सहकार अधिकारी व्ही. जे.वडतिले यांची सदस्य म्हणून नियुक्ती केली आहे. विशेष लेखापरीक्षक दूध संघाच्या संचालक मंडळाने जिल्हा सह. दूध उत्पादक या संघ नय सोलापूर दूध पंढरी झालेल्या संचालकांची नावे आहेत.संघ व सभासदांच्या हिताच्या दृष्टीने कामकाज न करता सभासदांच्या
हितास वाधा आणणारे कृत्य केले आहे. तसेच संघाचे व्यवस्थापन व्यावसायिक पध्दतीने न केल्याने संघाची आर्थिक परिस्थिती विकट झाली आणि तोटा सतत वाढत गेला. संचालक मंडळाने संघाप्रती असलेली कर्तव्ये पार पाडण्यात कसूर केल्याचा ठपका विभागीय दुग्ध उपनिबंधक पाटील यांनी आदेशात ठेवला आहे. अध्यक्ष रणजितसिंह शिंदे, उपाध्यक्ष दीपक माळी यांच्यासह वाळासाहेव माळी, मारुती लवटे, औदंवर वाडदेकर, संभाजी मोरे, राजेंद्र मोरे, विजय येलपल्ले,अलका चौगुले, योगेश सोपल, वैशाली शेवडे, ववनराव अवताडे, मनोज गरड, छाया ढेकणे, निर्मला काकडे, जयंत साळे, राजेंद्रसिंह पाटील अशी वरखास्तीची कारवाई झालेल्या संचालकांची नावे आहेत.
सोलापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक व प्रक्रिया संघाला अनेक वर्षांपासून आर्थिक तोटा
होत आहे. संचालक मंडळाचा निष्क्रिय कारभारच याला जवावदार आहे. प्रचंड मोठा तोटा होत
असतानाही संचालक मंडळाने काहीच उपाययोजना केल्या नाहीत. संचालक मंडळाच्या
कार्यकाळात सभासदांच्या हिताचा कारभार होत नाही, यासह इतर विविध ११ मुद्द्यांवर दूध संघ
वचाव कृती समितीचे अध्यक्ष अनिल अवताडे यांनी विभागीय दुग्ध उपनिबंधकांकडे तक्रार दाखल केली होती. याची दखल घेऊन दूध संघाच्या कारभाराच्या चौकशीसाठी विभागीय दुग्ध उपनिबंधकांनी लेखापरीक्षक पी. आर. शिंदे यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती केली होती. शिंदे यांनी चौकशी करून अहवाल सादर केला होता. या अहवालात संचालक मंडळावर अनेक गंभीर आरोप ठेवण्यात आले आहेत.या अहवालानुसार विभागीय दुग्ध उपनिबंधकांनी संचालक मंडळाला
कारणे दाखवा नोटिसा बजावल्या होत्या. याप्रकरणी विभागीय दुग्ध उपनिबंधकांकडे ९ व २२ जानेवारी,५, १७ व २७ फेब्रुवारी रोजी अशा एकूण पाच सुनावण्या झाल्या. यात दूध संघाला व संचालक मंडळाला म्हणणे मांडण्याची संधी दिली होती. त्यानुसार दूध संघ व संचालक मंडळाने वकिलांमार्फत स्वतंत्रपणे खुलासे सादर केले होते; परंतु विभागीय दुग्ध उपनिबंधक पाटील यांनी हे खुलासे अमान्य करीत संचालक मंडळावर वरखास्तीची कारवाई केली आहे.
0 Comments