शिक्षक भारती संघटनेच्या माळशिरस तालुका अध्यक्षपदी प्रा.शिवाजी बर्गे यांची निवड
नातेपुते (कटूसत्य वृत्त):-
उच्च माध्यमिक ज्यूनिअर कॉलेज
शिक्षक भारती संघटनेच्या माळशिरस तालुका अध्यक्षपदी प्राध्यापक शिवाजी बर्गे यांची निवड करण्यात आली.उच्च माध्यमिक ज्यूनिअर कॉलेज
शिक्षक भारती संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रा.शाहू बाबर यांच्या हस्ते प्राध्यापक शिवाजी बर्गे यांचा सन्मान करून त्यांना माळशिरस तालुका अध्यक्षपदाचे नियुक्तीपत्र देण्यात आले.यावेळी बोलताना तालुक्याचे नूतन अध्यक्ष प्राध्यापक शिवाजी बर्गे म्हणाले की, शिक्षक भारती संघटनेच्या तालुकाध्यक्ष पदाची जबाबदारी माझ्यावर देऊन शिक्षक भारती परिवाराने माझ्यावर टाकलेला विश्वास पूर्णपणे सार्थ ठरवण्यासाठी मी प्रामाणिकपणे प्रयत्न करून शिक्षकांचे प्रश्न, अडी - अडचणी सोडवण्यासाठी मी कटिबद्ध राहुल संघटना वाढीसाठी प्रयत्न करेन असे मत प्राध्यापक शिवाजी बर्गे यांनी निवडी प्रसंगी व्यक्त केले. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष्य प्रा.शाहू बाबर प्रा.महेश डोके,प्रा. महेंद्र बडीगेर उपस्थित होते.प्रा.शिवाजी बर्गे यांची उच्च माध्यमिक ज्यूनिअर कॉलेज शिक्षक भारती संघटनेच्या माळशिरस तालुका अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल शैक्षणिक ,सामाजिक ,राजकीय क्षेत्रातील मान्यवरांकडून सन्मान होत असून त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या जात आहेत.
फोटो ओळी :
प्रा.शिवाजी बर्गे यांना अध्यक्षपदाचे नियुक्तीपत्र देताना जिल्हाध्यक्ष्य प्रा.शाहू बाबर
0 Comments