Hot Posts

6/recent/ticker-posts

आष्टी उपसासिंचन योजनेतून सारोळे पाझर तलाव भरून द्या- आ. खरे

आष्टी उपसासिंचन योजनेतून सारोळे  पाझर तलाव भरून द्या- आ. खरे

मोहोळ (कटूसत्य वृत्त):- सध्या उन्हाळा सूरू असल्याने पाण्याची टंचाई भासू लागली आहे. अशातच बुधवारी उजनी कालवा सल्लागार समितीची बैठक जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी मोहोळचे आमदार राजू खरे यांनी सारोळे येथील पाझर तलाव भरून द्यावा, अशी मागणी विखे पाटलांकडे केली आहे. राज्याचे जलसंपदा मंत्री ना. डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांना देण्यांत आलेल्या निवेदनामध्ये आष्टी उपसासिंचन योजनेतून पाणी सोडण्यात यावे, यामध्ये प्रामुख्याने सारोळे (ता. मोहोळ) या तलावात आष्टी उपसा सिंचन योजनेतून पाणी सोडून सारोळे पाझर तलाव भरून घ्यावा, असे आ. खरे यांनी म्हटले आहे. या उजनी कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत पंढरपूर शहराला पिण्याकरीता पाणी राखीव ठेवण्यात यावे. उजनी क्षेत्रातील पाणी उचलणारे सर्व साखर कारखानदारांकडून कडून पाणी पट्टी सक्तीने वसूल करावी, याबाबत जलसंपदा मंत्री पाटील यांनी सूचना दिल्या आहेत. नदीकाठावर वरील सर्व नादुरूस्त बंधाऱ्यांची दुरुस्ती करून द्यावी, त्यामुळे पाणी गळती कमी होईल. असेही आ. खरे यांनी सांगितले. या बैठकीला क्रिडा मंत्री दत्तामामा भरणे, पालकमंत्री जयकुमार गोरे, मोहोळचे आ. राजू खरे, आ. आभिजीत पाटील, आ. समाधान आवताडे, आ. सुभाष देशमुख, आ. दिलीप सोपल, खासदार धैर्यशील मोहिते पाटील, खासदार प्रणिती शिंदे, आमदार नारायण पाटील, आमदार उत्तम जानकर, आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार देवेंद्र कोठे, आमदार बाबासाहेब देशमुख, सोलापूर, चिफ इंजिनिअर धुमाळ, कार्यकारी संचालक रजपूत, सोलापूर महापालिकेचे आयुक्त ओंबासे, पंढरपूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी प्रशांत जाधव, अधिक्षक अभियंता खांडेकर, साळे, कार्यकारी अभियंता संभाजी माने यांच्यासह उजनी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
Reactions

Post a Comment

0 Comments