Hot Posts

6/recent/ticker-posts

कोळगाव पंचक्रोशी ग्रामस्थांच्या वतीने चंद्रभागा तथा महाद्वार घाट स्वच्छता अभियान

कोळगाव पंचक्रोशी ग्रामस्थांच्या वतीने

चंद्रभागा तथा महाद्वार घाट स्वच्छता अभियान

पंढरपूर (कटूसत्य वृत्त):-कोळगाव पंचक्रोशी ग्रामस्थांच्या वतीने १३/४/२०२४ पासून दर महिन्यास चंद्रभागा तथा महाद्वार घाट,भक्त पुंडलिक मंदिर परिसर स्वच्छता अभियान राबवण्यात येत आहे . आणि पंढरपूर नगरपालिकेच्या वतिने जेसीबी,हायवा ट्रक उपलब्ध करून दिला जातो. यावेळेस मंगळवार तारीख ४/३/२०२५ रोजी स्वछता अभियान राबविण्यात आले. या ईश्वर कार्यास खूप वाढता प्रतिसाद मिळत आहे. या कार्यात कोळगाव, घारगाव, कोथूळ, वडाळी, भानगाव लोणी व्यंकनाथ तालुका श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर आणि भिगवण तालुका इंदापूर जिल्हा पुणे येथील २०० ते २५० भाविकांनी उन्हाची तमा न बाळगता भक्त पुंडलिक मंदिर आणि महाद्वार घाट चंद्रभागा परिसर स्वच्छ केला. कोळगाव ग्रामस्थांच्या वतीने सर्वाना विनंती करण्यात आली कि, अन्य गावच्या ग्रामस्थांनी सुद्धा या चंद्रभागा स्वच्छता अभियान राबवावे व इतरानाही या सत्य संकल्पाला प्रेरित करावे.चंद्रभागा तीर्थात कपडे, चपला, प्लास्टिक, कचरा टाकू नये याची दक्षता घ्यावी व हे सर्व टाकण्यासाठी प्रशासनाने याची स्वतंत्र व्यवस्था करावी.असे आवाहन कोळगाव पंचक्रोशी ग्रामस्थ ता.श्रीगोंदा जि. अनगर यांच्या वतीने करण्यात आले
Reactions

Post a Comment

0 Comments