करमाळा बंदला नागरिकांचा १००% प्रतिसाद
करमाळा,(कटूसत्य वृत्त):- मस्साजोगचे सरपंच स्व.संतोष देशमुख यांची अत्यंत अमानुषपणे झालेल्या हत्येच्या निषेधार्थ व धनंजय मुंडेला मुख्य सूत्रधार करून गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी सकल मराठा समाज करमाळाच्या वतीने दि. ०६ मार्च रोजी करमाळा बंदची हाक देण्यात आली होती, या बंदला नागरिकांनी प्रतिसाद देत १०० टक्के करमाळा शहर व तालुका बंद पाळून निषेध व्यक्त केला. यावेळी सकल मराठा समाज करमाळाच्या वतीने सकाळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून स्व.संतोष देशमुख यांच्या हत्येतील मास्टरमाईंड वाल्मिक कराड व धनंजय मुंडे यांना मुख्य सूत्रधार आरोपी करण्यात यावे तसेच संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्या आरोपींना भर चौकामध्ये फाशीची शिक्षा देण्यात यावी व आरोपींचे व्हिडिओ, फोटो कोर्टात आरोप पत्रात दाखल केलेले आहेत हाच ठोस पुरावा आहे आणि संतोष देशमुख यांना मारहाण करतानाचा फोटो, व्हिडिओ जे कोणाला पाठवले आहेत त्या सर्वांना आरोपी करण्यात यावे. तसेच संतोष देशमुख यांना मारहाण करत असताना देशमुख यांनी पाणी मागितल्यानंतर ज्या आरोपींनी त्यांच्यावर लघुशंका केली त्या आरोपीचे गुप्तांग काढण्यात यावे या सर्व मागण्या महाराष्ट्र शासनाने कोणालाही पाठीशी न घालता पूर्ण कराव्यात असे निवेदन करमाळा तहसीलचे नायब तहसीलदार लोकरे यांना देण्यात आले.
यावेळी बाळासाहेब गोरे, सुनिल सावंत, ऍड.नवनाथ राखुंडे, संजय घोरपडे, बबन चांदगुडे, दत्तात्रय काटकर तसेच रईस शेख, मुस्तकीम पठाण यांनी स्व. संतोष देशमुख यांच्या झालेल्या निर्घृण हत्येचा निषेध व्यक्त करत आरोपीना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे असे मत यावेळी व्यक्त केले. यावेळी सकल मराठा समाज करमाळा व बहुजन समाजातील बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments