विठ्ठलवाडीचे माजी सरपंच रामचंद्र जाधव यांचे निधन
माढा (कटूसत्य वृत्त):- विठ्ठलवाडीचे माजी सरपंच रामचंद्र नाना जाधव यांचे अल्पशा आजाराने बुधवारी राञी साडेसात वाजता निधन झाले.ते ८६ वर्षाचे होते.त्यांनी विठ्ठलवाडीचे जवळपास ३० वर्ष सरपंच म्हणून काम पाहिले.ते विठ्ठलवाडीचे उपसरपंच हनुमंत (अण्णा) जाधव यांचे वडील होते.त्यांचे गावाच्या सामाजिक व शैक्षणिक क्षेञात खूप मोठे योगदान होते.घरोघरी निर्धुर चूल या विशेष उपक्रमाबद्दल त्यांचा दिल्ली येथे तत्कालीन माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हस्ते येथे विशेष सत्कार करण्यात आला होता.त्यांच्या पश्चात विठ्ठलवाडीचे उपसरपंच हनुमंत (अण्णा) जाधव,तीन मुली व नातवंडे असा मोठा परिवार आहे.शोक व्यक्त करताना सुरेश शेंडगे म्हणाले की आप्पा यांनी कोणतीही काम करताना पदरमोड करत गावाच्या विकासास हातभार लावला होता.त्यांच्या आकस्मित निधनामुळे विठ्ठलवाडी व परिसरात शोककळा पसरली.याप्रसंगी नातेवाईक,मिञपरिवार व ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
0 Comments