पंतप्रधान मोदींनी कोणत्या मुघल बादशहाच्या कबरीवर फुलं वाहिली? व्हायरल झालेला 'तो' फोटो नेमका कुठला?
पुणे(कटूसत्य वृत्त):-औरगंजेबाच्या कबरीवरून राज्यातील राजकीय राजकारण सध्या चांगलंच तापलं आहे. अनेकांनी ही कबर काढून टाकण्याची मागणी केली आहे. यावरून सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने आले आहेत. दोघांकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप आणि टीका टीप्पणी सुरु आहे. याशिवाय विरोधकांकडून पंतप्रधान मोदींचा एक फोटो शेअर करण्यात आला आहे. या फोटोवरून सत्ताधाऱ्यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न विरोधकाकडून केला जातो आहे.या फोटोत पंतप्रधान मोदी मुघल बादशहाच्या कबरीवर फुलं वाहताना दिसून येत अशातच ही कबर औरंगजेबाची असल्याचं दावाही काही जणांकडून करण्यात आला आहे. मात्र, हा फोटो नेमका कुठला आहे? आणि मोदींनी खरंच औरंजेबाच्या कबरीवर फुल वाहिली का? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनीही हा फोटो शेअर करत महायुतीला
लक्ष्य केलं आहे. औरंगजेबचा शेवटचा वंशज बहादूरशहा जफरच्या म्यानमार येथील कबरीवर चादर आणि फुले अर्पण करताना अंधभक्तांचे मसीहा, असा टोला त्यांनी लगावला आहे. दरम्यान, पंतप्रधान मोदी यांचा जो फोटो व्हायरल होतो आहे, तो फोटो २०१७ म्यानमार दौऱ्यादरम्यानचा आहे. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी नमधील बहादूरशहा जफरच्या दर्गाला भेट दिली होती. त्यावेळी त्यांनी आदरांजली म्हणाली म्हणून बहादूरशहाच्या कबरीवर फुलं वाहिली होती. १८५७ च्या उठावात सहभागी झाल्यानंतर ब्रिटीशांशी बहादूरशहा जफरला अटक केली होती. कट रचल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला होता. तसेच त्याला ब्रिटीशांच्या ताब्यातील तत्कालीन बर्मा (आताचं म्यानमार) येथे ठेवण्यात आलं होतं. तिथेच ७ नोव्हेंबर १८६२ रोजी त्याचा मृत्यू झाला होता. मृत्यूनंतर त्याला बर्मा येथेच दफन करण्यात आलं होतं.
0 Comments