प्रत्येक केसमध्ये उज्वल निकम हे धोरण सरकारने आता बंद करावे
-: अॅड. गायकवाड
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- प्रत्येक केसमध्ये उज्वल निकम हे धोरण सरकारने आता बंद करावे. अॅड.उज्वल निकम यांची गुणवत्ता तपासण्याची गरज आहे. त्यांनी आजवर सरकारी वकील म्हणून काम पाहिलेल्या प्रत्येक खटलाचे स्ट्रक्चरल ऑडीट झाले पाहिजे, अशी मागणी विधी सेवा फौंडेशनचे अध्यक्ष तथा शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कायदा विभागाचे निमंत्रक ॲड. सुरेश गायकवाड यांनी एका पत्रकाद्वारे केली.मस्साजोग प्रकरणातील संतोष देशमुख हत्याप्रकरणी अॅड. उज्वल निकम यांची नियुक्ती महाराष्ट्र शासनाच्या विधी व न्याय खात्याने केली आहे. ही जरा चिंतेची बाब वाटते. यातून देशमुख कुटुंबीयाना निरपेक्षपणे न्याय मिळेल असे वाटत नाही. कारण भाजपाच्या नेतृत्वाखालील राज्यातील मंत्री मंडळात असणाऱ्या महत्वाच्या मंत्र्यांवर या प्रकरणात आरोप होत आहेत.
अॅड. उज्वल निकम हे भाजपाचे सक्रीय सदस्य आहेत. त्यामुळे राज्यात कोणतीही घटना घडली तर, यासाठी अॅड. उज्वल निकम म्हणजे काय औषध नाही. राज्यात अनेक विधिज्ञ गुणवत्तेच्या निकषावर उजवे आहेत. यापुढे नव्या दमाच्या वकिलाना संधी देणे गरजेचे असे असतांना विधी न्याय मंत्रालय अॅड. उज्वल निकम यांच्याच भोवतीच फिरते हे न समजलेले कोडे आहे. भाजपच्या संस्कृतीत घडलेल्या अॅड. निकम यांची यापुढे कोणत्याही खटल्यात नियुक्ती करू नये,मस्साजोग प्रकरणातील देशमुख खून खटल्यात शासनाने नियुक्त केलेली अॅड. निकम यांची नियुक्ती तात्काळ रद्द करावी, अशी मागणी विधी सेवा फौंडेशनच्या माध्यमातून त्यांनी केली आहे. याबाबत आपण मुख्यमंत्री,राज्यपाल व उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश यांच्याकडे पत्रव्यवहार करणार असल्याचे या पत्रकात म्हटले आहे.
.jpg)
0 Comments