यंग माईंड्स ॲन्ड मशिन्स एक्स्पो २०२५ मध्ये
श्री समर्थ विद्यामंदिरचा चमू जिल्ह्यात प्रथम
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आयोजित 'यंग माईंड्स अँड मशिन्स एक्स्पो २०२५' या पहिल्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये सोलापूरच्या शास्त्रीनगर येथील श्री समर्थ विद्यामंदिरच्या चमूने जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला. अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या हस्ते एसव्हीआयटी पॉलिटेक्निक कॉलेज, सोलापूर येथे या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. रोख २५०१ रुपये सन्मानचिन्ह व सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. भाजपा अभियंता सेल व पदवीधर प्रकोष्ठ सेल यांच्या संयुक्त विद्यमाने या विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.
श्री समर्थ विद्यामंदिरच्या इयत्ता सहावीतील साक्षी कुंभार, उमेरा सय्यद, मेघा कुंभार, परिणिती सोनकांबळे, मदिहा मुल्ला या पाच जणींच्या चमूने 'युनिक अँड स्मार्ट मेथड ऑफ डेटा ऑर एनर्जी ट्रान्सफॉर्मेशन' या विषयावर आपले सादरीकरण केले. यासाठी त्यांना शाळेचे तंत्रस्नेही शिक्षक श्री राजकिरण चव्हाण यांनी मार्गदर्शन केले.
जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील एकूण ७४ शाळेच्या १६८ प्रयोगांचे सादरीकरण केले. या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष रवींद्रकुमार शिखरे, सचिव अरुण शिखरे, मुख्याध्यापक मल्लिनाथ स्वामी, सर्व शिक्षक आणि पालकांनी अभिनंदन केले आहे.

0 Comments