सोलापूर जिल्ह्यात चार हजार घरांवर सौरऊर्जा निर्मिती सुरू
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या पहिल्या शंभर दिवसात प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या सव्वा लाखापेक्षा अधिक करण्याचे आणि एकूण वीजनिर्मिती क्षमता ५०० मेगावॉट करण्याचे उद्दिष्ट महावितरणने ८२ दिवसांत पूर्ण केले आहे. सोलापूर जिल्ह्यात या योजनेअंतर्गत सुमारे चार हजार घरांवर सौरऊर्जा निर्मिती सुरू झाली आहे.
प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेचा लाभ घेणाऱ्या घरांची एकूण संख्या ६ डिसेंबर रोजी ७१हजार ४३७ होती व त्यांची एकूण क्षमता २८३ मेगावॉट होती. शंभर दिवसांच्या मोहिमेत एकूणघरांची संख्या १.२५ लाख व एकूण वीजनिर्मिती क्षमता ५०० मेगावॉट करण्याचे उद्दिष्ट निश्चितकरण्यात आले होते. राज्यात २६ फेब्रुवारी रोजी योजनेच्या लाभार्थी घरांची संख्या १ लाख २८हजार ४७० व एकूण क्षमता ५०० मेगावॉट झाली होती. या योजनेचे शंभर दिवसांचे उद्दिष्ट ८२दिवसांत पूर्ण झाले.या आधी महावितरणने मागेल त्याला सौर कृषीपंप योजनेत बसविण्यात आलेल्या पंपांची संख्या दीड लाखापेक्षा अधिक करण्याचे शंभर दिवसांचे उद्दिष्ट साठ दिवसांत पूर्ण केल्याची माहिती महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी दिली.प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेचा लाभ घेण्यामध्ये राज्यात नागपूर जिल्ह्याने प्रथम क्रमांकमिळविला आहे. नागपूरमध्ये आता लाभार्थी घरांची संख्या २१ हजार २७ झाली आहे. नागपूरनंतर पुणे (९८७५ घरे), जळगाव (९४८९ घरे), छत्रपती संभाजीनगर (८८१४ घरे), नाशिक (८५५८ घरे),अमरावती (७११९ घरे), कोल्हापूर (६२९१ घरे),धुळे (४१८७ घरे) आणि सोलापूर (४००७ घरे)या जिल्ह्यांचा क्रम लागतो.
.jpg)
0 Comments