Hot Posts

6/recent/ticker-posts

शंकरनगर येथील कुस्ती स्पर्धेत पै. शुभम सिदनाले विजयी

 शंकरनगर येथील कुस्ती स्पर्धेत पै. शुभम सिदनाले विजयी 


अकलूज (कटूसत्य वृत्त):- शंकरनगर येथे महाशिवरात्र यात्रेनिमित्त आयोजित केलेल्या जंगी निकाली कुस्त्यांच्या, कुस्ती फडातील शेवटच्या कुस्तीकडे, सर्वांचे लक्ष लागून राहिलेली एक लाख रुपये इनामाची शेवटची  कुस्ती  शुभम सिदनाले( शिवराम दादा तालीम पुणे ) विरुद्ध गणेश कुंकुले ( शाहूपुरी तालीम कोल्हापूर ) यांच्यात झाली, यामध्ये शुभम शिदनाळे हा विजयी झाला.  शुभम शिदनाळे यांनी सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ करत,  गणेश कुंकूले  याचा हात पाठीमागे घेऊन गिस्सा  डावावर   गणेश कंकुले यांना चिटपट केले व विजय संपादन केला.  शिवरात्री महोत्सव समिती चॅरिटेबल ट्रस्टचे  अध्यक्ष जयसिंह मोहिते पाटील यांच्या शुभहस्ते विजयी मल्ल शुभम शिदनाले यांचा व गणेश कुंकुले या दोन्ही मुलांचा सन्मान करण्यात आला  यावेळी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, महाशिवरात्री समितीचे कार्याध्यक्ष मदनसिंह मोहिते पाटील यांच्यासह कारखान्याचे आजी-माजी संचालक यात्रा समितीचे संचालक, सांगली सातारा, कोल्हापूर, पुणे,सोलापूर या जिल्ह्यातून आलेले मल्ल नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.  शंकरनगर येथे झालेल्या महाशिवरात्र यात्रेनिमित्त घेण्यात आलेल्या जंगी कुस्त्यांच्या  फडामध्ये 400 मल्लांनी सहभाग नोंदवला होता.

Reactions

Post a Comment

0 Comments