अनगर प्रशालेत राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा
अनगर (कटूसत्य वृत्त):- अनगर येथील कै. शंकरराव बाजीराव पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात आला या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून बार्शी येथील हेमंत शिंदे व मधुकर शेळके हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्राचार्य चंद्रकांत ढोले हे होते. यावेळी राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त घेण्यात आलेल्या प्रश्नमंजुषा स्पर्धेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देऊन सन्मानित करण्यात आले
यावेळी विद्यार्थ्यांसाठी अंधश्रद्धा निर्मूलन व वैज्ञानिक जाणीव जागृतीसाठी प्रात्यक्षिकाचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षीय भाषणात प्राचार्य चंद्रकांत ढोले यांनी डॉ. सी व्ही रामन यांचे विज्ञानातील कार्य याविषयी माहिती देऊन वैज्ञानिक किस्से सांगितले.
कार्यक्रमासाठी उपप्राचार्य महादेव चोपडे, पर्यवेक्षक माधव खरात,विज्ञान मंडळाचे अध्यक्ष परमेश्वर थिटे, गोरख गायकवाड, विलास गुंड,उज्वला घोलप, माधवी पाचपुंड, हनुमंत गुंड, सुनील सरक, पुनम गुंड परमेश्वर कुंभार, विकास चव्हाण, झाकीर मुलानी शमा काझी, रेश्मा गुंड, गणेश नकाते, बाळासाहेब थिटे आदी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

0 Comments