जुनी मिल जागेसाठी पैसे भरलेल्या नागरिकांना कुमार करजगी यांचे जाहीर आवाहन
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सन १९६३ साली १५००० मजूर काम करीत असलेली जुनी मिल मालक मुरारका यांनी कामगार कपात सुरु केल्याने त्या विरोधात मिलमध्ये कामगारांनी संप सुरु केला. मिल मालकाने कामगारांच्या संपाकडे दुर्लक्ष करून मिलमध्ये कामगार कपात सुरु केल्याने कामगारांनी मिल मालकाचा पुतळा मिलच्या गेट समोर जाळला.कामगारांनी आपला पुतळा जाळला या घटनेचा मिल मालकाला प्रचंड राग आला आणि त्यांनी १५००० मिल कामगार काम करीत असलेली जुनी मिल तडकाफडकी बंद केली. मिलकडील आपले पैसे वसूल करण्यासाठी बँक ऑफ बडोदाने, केंद्र व राज्य सरकार व इतर धनको मंडळींनी उच्च न्यायालयामध्ये सूट फाईल केला.गरीब कामगारांना कोर्टाकडून त्यांच्या कष्टाचा पैसा मिलच्या मशनरी व इतर मालमत्ता विक्री करून २५ वर्षानंतर सुद्धा मिळाला नाही. मुंबई हायकोर्ट रिसिव्हरने सदर मिलची जमीन १९८८ साली जाहीर लिलावाने विक्रीस काढली असता कामगार पुत्र कुमार करजगी यांनी जुनी मिलच्या जागा विक्रीतून गरीब कामगारांना केंव्हा पैसे मिळतील याची कोर्ट रिसिव्हरकडे चौकशी केली असता कोर्टाकडून समजले की १९६३ साली कामगारांच्या पैशाचे क्लेम्स दाखल केले नसल्याने सदर मिलची जागा विक्रीतून बँक, केंद्र व राज्य सरकारचे पैसे मिळतील कामगारांना मिळणार नाहीत. हे समजताच कामगार पुत्र कुमार करजगी यांनी ९ ऑगस्ट १९८८ साली जुनी मिल बेकार कामगार वारसदार संघटना स्थापन करून हायकोर्टाचे मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी साहेब व बार कौन्सिलचे सेक्रेटरी एम.एम.वैद्य यांच्या सहकार्यामुळे कामगार पुत्र कुमार करजगी यांनी ९००० कामगारांचे क्लेम्स २५ वर्षानंतर न्यायालयात दाखल करून जुनी मिलच्या जागा विक्रीतून कामगारांना अग्रक्रमाने पैसे देण्याचे आदेश मिळविले परंतु जुनी मिलच्या सर्व जागा सोलापुरातील स्वार्थी राजकीय व बिल्डर मंडळी संगनमताने रिंग करून फक्त १ कोटी ७० लाखात लिलावातून घेऊ लागली. त्यावेळी सदर लिलावामध्ये औरंगाबादचे मोठे बिल्डर जुगलकिशोर तापडिया यांनी जुनी मिलच्या जागेच्या लिलावामध्ये जास्त रकमेचे टैंडर भरले असता सदर जागा कमी किंमतीत हडप करणाऱ्या स्वार्थी राजकीय व बिल्डर मंडळींनी जुगलकिशोर तापडिया यांना मारहाण करून लिलावातून बाहेर काढले. जुनी मिलच्या जागा कमी किंमतीत गेल्यातर कामगारांना त्यांच्या कष्टाचा पैसा कधीच मिळणार नाही. कामगार पुत्र कुमार करजगी यांनी जुगलकिशोर तापडिया यांना सांगितले की तुम्ही लिलावात भाग घ्यावा मी तुमच्या पाठीशी राहतो. त्यावेळी जुगलकिशोर तापडिया यांनी करजगी यांना सांगितले की तुम्ही जागेच्या लिलावात भाग घेऊन १० कोटीपर्यंत किंमत वाढवा. मी तुम्हास जागेचे पैसे भरून आपण पुढील व्यवहार करू. कामगारांना त्यांच्या कष्टाचा पैसा मिळावा या एकाच उद्धीष्ठाने कुमार करजगी यांनी लिलावामध्ये भाग घेण्यासाठी कोर्टाच्या अटीप्रमाणे ३० लाख रु. न्यायालयात भरून लिलावात भाग घेण्याचे आदेश मिळविले. कुमार करजगी यांच्या कार्यामुळे सोलापुरातील प्रतिष्टीत असे डॉ. वळसंगकर, तूळपुले, रंगा अण्णा वैद्य, केळकर यांनी माझी भेट घेऊन २५ वर्षानंतर मिलच्या कामगारांना मी पैसे मिळवून देत असलेल्या कार्याबद्दल माझे अभिनंदन करून त्या प्रतिनिधी मंडळींनी मला सांगितले की सदरची जागा लिलावातून घेतल्यानंतर बाहेरील बिल्डरकडे न जाऊ देता सोलापुरातील नागरिकांना १००० व २००० स्केव. फुटाचे प्लॉट देण्याची योजना राबविली तर सोलापुरातील इतिहासामध्ये फार मोठे नाव होईल. मी सर्व प्रतिष्टीत मंडळीना सांगितले की मला फक्त माझ्या जुनी मिलच्या कामगारांना पैसे मिळवून देण्याचे ध्येय आहे. आपण सर्व मंडळी सदर जुनी मिल जागेत शहरातील सर्वसामान्य नागरिकांना मिळवून देण्यासाठी माझ्या सोबत आल्यास मी औरंगाबादचे बिल्डर जुगलकिशोर तापडिया यांच्याकडून पैसे घेणार नाही. त्यानंतर सर्व प्रतिष्टीत मंडळींनी दैनिकांतून जाहीर आवाहन केले की सोलापुरातील ज्या नागरिकांना जुनी मिलमध्ये प्लॉट पाहिजे आहे त्यांनी युको बँकेत स्वतःच्या नावे खाते काढून पैसे जमा करावेत. प्रतिष्टीत मंडळींनी केलेल्या आवाहनामुळे शहरातील नागरिकांनी युको बँकेत पैसे जमा केले. जुनी मिल कंपाऊंड प्लॉट नं.१ ही जागा समितीस २ कोटी ४० लाखात मंजूर झाली असताना २० रु. स्क्वे.फुटाने देण्याचा विचार प्रतिष्टीत मंडळींनी केला. परंतु स्वार्थी बिल्डर व राजकीय मंडळींनी सदर जुनी मिल कंपाउंड ही जागा ५ कोटी १० लाखात घ्यावी लागली. लिलाव अटीप्रमाणे २५% रक्कम १५ दिवसात भरणेसाठी युको बँकेत पैसे भरलेल्या नागरिकांना आवाहन केले की ३० रु. स्क्वे.फुटाने जागा ज्यांना पाहिजे त्यांनी हायकोर्ट रिसिव्हरच्या नावे डिमांड ड्राफ्ट काढून द्यावे. त्याप्रमाणे ७७८ नागरिकांनी २ कोटी ५६ लाख रु. लिलाव अटीप्रमाणे २५% रक्कम न्यायालयात भरली. माझ्या या ऐतिहासिक कार्यामुळे जुनी मिलची सर्व जागा फक्त दोन कोटीच्या आत घेऊ पाहणाऱ्या राजकीय व बिल्डर मंडळींचा स्वार्थी डाव उधळला गेल्यामुळे त्या मंडळींनी महापालिका आयुक्त व धर्मादाय कार्यालयातील अधिकारी वर्गाला हाताशी धरून प्रचंड गैरसमज निर्माण केल्याने आम्ही ९ कोटी ३६ लाख रु. घेतलेल्या जागा राहिलेली ७५% रक्कम भरू न शकल्याने उच्च न्यायालयाने समितीच्या नावे मंजूर झालेला लिलाव रद्द करून जुनी मिल जागेसाठी ज्या ७७८ नागरिकांनी भरलेली रक्कम जप्त केली. रक्कम जप्त झाल्यावर मी सर्व प्रतिष्टीत मंडळींना वचन दिले की मी नागरिकांचे न्यायालयातून जप्त झालेले त्यांचे पैसे परत मिळवून देईन अन्यथा त्याना जागा मिळाल्यास ज्या किमतीमध्ये जागा मिळाली त्याच किमतीमध्ये जागा देईन हे सांगून मी माझ्या कामगार व वारसदारांना सोबत घेऊन जुनी मिलच्या गेटसमोर १० वर्षे सत्याग्रह करून अनेक अडचणीतून मार्ग काढीत न्यायालयीन संघर्ष करीत सावकाराकडून प्रचंड व्याजाने पैसे घेऊन कोर्टाकडून ज्यांनी जागेसाठी पैसे भरलेत त्यांना सदर जागेचे कायदेशीर वाटप होण्यासाठी सदर मिलच्या जागा उच्च न्यायालयाच्या आदेशाने २२/४/१९९८ रोजी उमा सहकारी गृह निर्माण संस्था स्थापन करून ज्यांनी १९८९ साली ज्या ७७८ नागरिकांनी जागेसाठी २५% रक्कम भरली होती. त्यांना १ ते१० उमा सहकारी गृह निर्माण संस्था स्थापन करून चिठठी पद्धतीने प्लॉटचे वाटप केले. सदर जागेवर पैसे भरलेल्या ८०% नागरिक गेल्या २० वर्षापासून आपली घर बांधून राहत आहेत. महापालिकेने जागेवरील पूर्ण आरक्षण न उठविल्याने प्लॉटचे वाटप होऊन सुद्धा सदर जागेवर पैसे भरलेल्यापैकी १०% लोकांना घरे बांधता येत नाही. बाकी पैसे भरलेल्या १०% लोकांना स्वार्थी बिल्डर व राजकीय मंडळीशी संगनमत करून माझ्या विरोधात प्रचंड खोट्या तक्रारी करून प्रचंड मानसिक त्रास दिला. त्या सर्व सभासदांना मी या पत्रद्वारे विनंतीपूर्वक सांगू इच्छितो की ज्या किमतीत न्यायालयातून जागा मिळाली आहे त्याच किमतीत मी आपणास जागा देण्यास तयार आहे. आपण आपले इंजिनीअर, सी.ए., वकील व इतर संबंधितना एकत्रित बसवून ज्या किमतीत कोर्टातून जागा आली आहे त्याच किमतीत घ्यावी. कारण मी गेली ४० वर्षे जो न्यायालयीन संघर्ष केला. तो मिलच्या कामगारांना पैसा मिळावा म्हणून आणि आज या जागा मिळविण्यासाठी ज्या माझ्या कामगार व वारसदारानी जुनी मिलच्या गेटसमोर १० वर्ष बसून सत्याग्रह केला. त्या कामगारांच्या वारसदारांना माझ्याकडे राहिलेली माझी सर्व जमीन मी त्यांना घरे बांधण्यासाठी मोफत देणार आहे. १९८९ साली ज्या प्रतिष्टीत मंडळींनी केलेल्या आवाहनामुळे आपण जागेचे पैसे भरले होते. त्यांना मि वचन दिले होते की एकतर त्यांना पैसे मिळवून देईन अथवा जागा मिळवून देईन असे वचन मि सर्व प्रतिष्टीत मंडळींना दिले होते. त्यामुळे या पत्रकाद्वारे मि विनंती करतो की आपण एक महिन्याच्या आत महापालिकेच्या नियमाप्रमाणे होणारी रक्कम भरून आपला प्लॉट ताब्यात घ्यावा अन्यथा आपणास कोर्टाच्या आदेशप्रमाणे व्याजासह रक्कम देण्यात येईल. असे जुनी मिल बेकार कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष कुमार करजगी यांनी सांगितले.
0 Comments