Hot Posts

6/recent/ticker-posts

पुस्तक माणसाचं आयुष्य समृद्ध करतात - कवी नितीन राऊत.

 पुस्तक माणसाचं आयुष्य समृद्ध करतात -  कवी नितीन राऊत.

 सोलापूर (कटूसत्य वृत्त):- पुस्तकाच्या वाचनामुळे माणसाचे आयुष्य समृद्ध तर होतच, पण वाचनामुळे माणूस अहंकार शून्य बनतो. माणसाने कोणत्याच गोष्टीचा अहंकार बाळगू नये. कारण जगातली प्रत्येक गोष्ट ही क्षणभंगुर असते. त्यामुळे अहंकाराचा अंगीकार करू नये. जेवढी जास्त पुस्तक वाचाल तेवढे जास्त ज्ञान मिळेल आणि अहंकार गळून पडेल.असे मत कवी अनंत राऊत यांनी व्यक्त केले. 

जिल्हा ग्रंथालय जिल्हा ग्रंथालयाच्या वतीने सोलापूर ग्रंथोत्सवाचे भव्य प्रदर्शन, ग्रंथ विक्री व साहित्य मेळावा या कार्यक्रमाचे आयोजन शहरातील शिवछत्रपती रंगभवन येथे करण्यात आले होते सोलापूर ग्रंथोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी राऊत हे बोलत होते. 

यावेळी सहाय्यक ग्रंथालय संचालक पुणे विभागाच्या शालिनी इंगोले, ज्येष्ठ पत्रकार सचिन जवळकोटे, साहित्यिक डॉ. शिवाजीराव देशमुख, साहित्य अकादमी पुरस्कार विजेते देविदास सौदागर, ग्रंथमित्र कुंडलिक मोरे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुनील हुसे, सोलापूर जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष विजयकुमार पवार, कार्यवाह साहेबराव शिंदे, उपाध्यक्ष पांडुरंग सुरवसे, निरीक्षक प्रमोद पाटील, निरीक्षक संजय ढेरे, निरीक्षक प्रदीप गाडे,अन्सार शेख, विनोद गायकवाड,भीमाशंकर बिराजदार, सिद्धारूढ बेडग्नूर, सदाशिव बेडगे, ज्योतीराम चांगभले, महेश कुलकर्णी, गुरुनाथ गोविंदे, वृषाली हजारे, सारिका मोरे, यल्लाप्पा घोडके, विना गिडवीर, जगदीश ईडमशेट्टी, तात्यासाहेब भोसले, धोंडीराम जेऊरकर, निरसिन मिसालो, अशोक मोरे धोंडीराम बंडगर यांच्यासह ग्रंथोत्सव समिती, उपसमिती, संयोजन सहाय्य समितीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. 

यावेळी कार्यक्रमाचे उदघाटन दीप प्रज्वलन करून करण्यात आले. संगमेश्वर कॉलेज येथून सात रस्ता मार्गे रंग भवन पर्यंत ग्रंथ दिंडी काढण्यात आली होती .उच्च व तंत्र शिक्षण विभाग, ग्रंथालय संचलनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, सोलापूर आयोजित महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरण २०१० अंतर्गत, कार्यक्रमाचे आयोजन ९ व १० मार्च २०२५ असे दोन दिवस करण्यात आले होते.

यावेळी साहित्य अकादमी पुरस्कार विजेते साहित्यिक देविदा सौदागर म्हणाले की, माणसाच्या हातात आज टीव्ही मोबाईल मुळेस मनोरंजन होईल पण संवाद होत नाही. पुस्तकांमधून माणूस घडतो पुस्तकांमधून मनोरंजना बरोबर प्रबोधनही होते वाचनामुळे संवेदनशील मन तयार झाले की माणसाला मनशांती मिळते. आत्महत्येचा सतत विचार मनामध्ये असणाऱ्या माणसाच्या हातात जर पुस्तक दिल तर त्यातल्या एका ओळीने त्याची आयुष्यही बदलून जाते म्हणून कोणताही निर्णय घेण्याअगोदर किमान एक तरी पुस्तक वाचणं गरजेचं आहे असे मतही सौदागर यांनी व्यक्त केले.

यावेळी जेष्ठ पत्रकार सचिन जवळकोटे म्हणाले की, कार्यक्रम पत्रिकेमध्ये अनेक नेत्यांची नावे होती पण ते एकही राजकीय नेता या कार्यक्रमाला हजर राहिलां नाही. कारण त्यांचा अन्  ग्रंथांचा काहीही संबंध नाही. कदाचित त्यामुळे ते आले नसावेत असा टोलाही त्यांनी लगावला. 

उपस्थित मान्यवरांचे आभार जिल्हा ग्रंथालयाच्या वतीने प्रमोद पाटील यांनी मांनले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवीण देशमुख यांनी केले. हा ग्रंथोत्सव यशस्वी पार पाडण्यासाठी कार्यालयाचे संजय ढेरे, प्रदीप गाडे, यल्लाप्पा घोडके, महेश कुलकर्णी आदी कार्यकर्ते कर्मचारी परिश्रम घेत असल्याचे दिसून आले.

या कार्यक्रमास सोलापूर जिल्ह्यामधून सार्वजनिक ग्रंथालयाचे पदाधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते या ग्रंथ स्वदरम्यान प्रचंड प्रमाणात ग्रंथाची विक्री होत असल्याचे दिसून येत आहे. ग्रंथ विक्रीचे स्टॉल वरती गर्दी होत आहे आवडीचे ग्रंथ विकत घेतली जात आहेत. 

वनवा तसाच आहे पाऊस सरून गेला .

विस्तव विझेल कैसा आतून पेटलेला 

होता विकास आधी जो दास बंगल्याचा 

कित्येक पुस्तकांनी तो झोपडीत नेला.

ज्या ज्या लोकांनी पुस्तकाची मैत्री केली ती लोक या जगात यशस्वी झाली निवडक दर्जेदार पुस्तक वाचली पाहिजे.

वाचन हे ताकासारखे आहे, ज्ञान लोण्यासारखे आहे.

जसं ताक लोण्यासाठी दही लावल्याशिवाय मिळत नाही तसं वाचल्यानंतर चिंतन केल्याशिवाय ज्ञान मिळत नाही. सुप्रसिद्ध कवी अनंत राऊत यांनी याप्रसंगी व्यक्त केले. आपल्या गोड वाणीतून आपली प्रसिद्ध कविता ऐकवण्यात आली यामध्ये त्यांची गाजलेली कविता दुःख अडवायला उंबर्यासारखा मित्र वनव्यामध्ये  गारव्यासारखा या कवितेने प्रेक्षकाची मने जिंकली. 

 देविदास सौदागर यांनी आपल्या भाषणांमधून पुस्तके विकत घेऊन वाचली पाहिजे दररोज दहा ते पंधरा मिनिट पुस्तके वाचलीच पाहिजे वाचनामुळे संवेदनशील समाज निर्माण होतो व संवेदनशील समाजाची आजची गरज आहे आजच्या भयावान वातावरणात त्याची जास्तच गरज आहे वाचन आजच्या परिस्थितीला उत्तर म्हणून पर्याय असू शकतो.

तर ज्येष्ठ साहित्यिक डॉ. शिवाजीराव देशमुख यांनी आपल्या अभ्यासपूर्ण भाषणामध्ये, धर्म जात कधी आडवी नसते भक्तीला, चालत राहावं वाटा पुस्तक असावं सोबतीला. पुस्तक शब्दांच्या मोत्यात गुंफलेला हार वळणाच्या वाटेवर विसाव्याचा आधार. पुस्तक मोरपीस बनवून काळजावर फिरतं , दुःखाच्या जखमेवर हळूच फुंकर मारत. अशा अनमोल विचारांनी सभागृहास साहित्याची दिशा दाखवण्याचा प्रयत्न केला.

Reactions

Post a Comment

0 Comments