स्व. महेश कोठे यांच्या जयंतीनिमित्त सुशील रसिक सभागृह येथे बैठक संपन्न
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- राष्ट्रवादी चे सर्वेसर्वा स्व. महेश (आण्णा) विष्णुपंत कोठे यांच्या 1 एप्रिल रोजी जयंतीनिमित्त विविध सामाजिक उपक्रम संदर्भात चर्चा करण्यासाठी सायंकाळी सुशील रसिक सभागृह येथे सर्व प्रमुख कार्यकर्त्यांची मीटिंग आयोजित करण्यात आले होते.. अण्णांच्या फोटोला हार घालून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली, अनेक मान्यवरांनी डोळ्यातून अश्रू काढून अण्णांच्या आठवणी सांगितल्या, काही मान्यवरांनी पाणपोई चे आयोजन करण्यात सांगितले आहे,काहींनी रक्तदान शिबिर घेण्यास सांगितले आहे, तर काहींनी वृक्षारोपण करण्यास सांगितले, महेश कोठे यांची जयंती निमित्त विडी घरकुल परीसर येथे सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे, डॉ सूर्यप्रकाश कोठे हे त्यांच्या हॉस्पिटलमध्ये मोफत आरोग्य शिबिर घेण्यात येणार असून, तसेच, आमदार देवेंद्र कुठे हे अनुउपस्थिती असल्यामुळे ते व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे मान्यवरांशी संवाद साधले.
या वेळी सोलापूर महापालिकेचे माजी नगरसेवक उमेश गायकवाड, सुरेश पाटील, प्रथमश कोठे, अशोक नीम्बरगी, ज्ञानेश्वर सपाटे, गुरुशांत धूतरगावकर, महेश गादेकर ,प्रशांत बाबर, बिजू प्रधाने,अशोक निंबर्गी, अंबादास करगुळे, मेघनाथ येमुल, श्रीनिवास जोगी, व्यंकटेश कोंडी, नाना काळे, राजकुमार हंचाटे, मधूकर आठवले,दिलीप कोल्हे, देवेंद्र भंडारे, बाळासाहेब शेळके, भूपती कमटम, पिंटप्पा गड्डम, मल्लिकार्जुन कमटम, अंबादास बिंगी, रामचंद्र जन्नू, सुरेश फलमारी, नरसैया इप्पाकायल, अशोक इंदापुरे,जनार्दन कारमपुरी, पद्मशाली ऑल इंडिया अध्यक्ष कंदकटला स्वामी, सत्यनारायण बोल्ली, रामकृष्ण कोंड्याल,दत्ता सुरवसे, नागेश वल्याळ तरी सर्व प्रमुख कार्यकर्त्यांची मोठया प्रमाणात उपस्थिती होती.
0 Comments