दस्त नोंदणीसाठी दोन तासांनी वेळ वाढविली
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- मार्चअखेर दुय्यम निबंधक कार्यालयात खरेदी विक्रीसाठी होणारी. गर्दी पाहता शासनाने दोन तासांनी वेळ वाढविली आहे. जिल्ह्यातील सर्व दस्त नोंदणी कार्यालये पूर्वी सहा पर्यंत सुरू असायची आता रात्री सव्वाआठपर्यंत सुरू राहणार आहेत. याचा नागरिकांना लाभ घ्यावा, असे आवाहन मुद्रांक जिल्हाधिकारी पी. जी. खोमणे यांनी केले आहे. चार वर्षांपासून रेडीरेकनर दरात वाढ झालेली नाही. कोरोनानंतर लोकसभा आणि विधानसभेची निवडणुक यामुळे रेडीरेकनर दर स्थिर राहिले होते. यंदा शासनाच्या तिजोरीवर विविध योजनांचा भडीमार झाल्याने उत्पन्न कमी झाले आहेत. १ एप्रिलपासून रेडीरेकरनदारात वाढ होण्याची शक्यता आहे. मार्चमध्ये दस्त नोंदणीची संख्या वाढण्याची शक्यता आहे. वाढणारी दस्तसंख्या, सर्व्हर डाऊनची तांत्रिक अडचण लक्षात घेऊन मुद्रांक विभागाने दस्त नोंदणीसाठी कार्यालयाची वेळ दोन तासांनी वाढवली आहे. १ ते ३१ मार्चपर्यंत सध्याची वेळ राहणार आहे. नागरिकांनी सायंकाळी ६ वाजेपर्यंत दस्त सादर करणे आवश्यक राहणार आहे.

0 Comments