नीतेश राणे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यात यावी सर्वधर्मीय पदाधिकाऱ्यांची धरणे आंदोलनाद्वारे मागणी
सोलापूर (कटूसत्य वृत्त):-मत्स्य विकासमंत्री नीतेश राणे हे अल्पसंख्याक मुस्लीम समाजाच्या विरोधात वक्तव्ये वारंवार भडकावू करुन समाजात दुफळी निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असल्याने त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यात यावी, तसेच त्यांच्या विरोधात दाखल असलेल्या गुन्ह्यांमध्ये त्यांना अटक करावी, या मागणीसाठी माजी महापौर अॅड. यू. एन. बेरिया यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी सर्वधर्मीय पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय पूनम गेटसमोर धरणे आंदोलन केले.याप्रसंगी अॅड. बेरिया यांच्यासह राजेंद्र कोरे, नागेश म्हेत्रे, इम्तियाज वळसंगकर, नजीर मुजावर आदी पदाधिकाऱ्यांनी राणे यांच्याविरुध्द कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली. आंदोलनकर्त्यांनी राणे यांच्याविरोधात घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला.याप्रसंगी बोलताना अॅड. बेरिया म्हणाले, नीतेश राणे हे आपल्या भडकावू भाषणातून अल्पसंख्याक समाजाला वेठीस धरुन दोन समाजात द्वेष व दुही निर्माण करुन विष पेरण्याचे काम करीत आहेत. एवढेच नव्हे तर भारतीय राज्य घटनेतील तरतुदींचा अपमान करीत आहेत. त्यांचा राजीनामा घेऊन त्यांच्याविरुध्द कारवाई न केल्यास यापुढील काळात तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दिला.
धरणे आंदोलनादरम्यान शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर केले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी आंदोलनकर्त्यांच्या भावना सरकारपर्यंत पोहोचविण्याचे आश्वासन दिले.
या आंदोलनात अल्लाबक्ष मनियार, सिध्दाराम उंबरजे, विलास सदाफुले, रजाक मकानदार, मुबीन बागवान, हिसबर पठाण, कुद्दुस सय्यद,

0 Comments