बंदचा आदेश असतानाही चिकन विक्री खुलेआम सुरू
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन फक्त कागदी घोडेच नाचवत असल्याचे आजही दिसले. किल्ला बाग व धर्मवीर संभाजी महाराज तलाव परिसरातील चिकन, अंडी व तत्सम पदार्थांची विक्री बंदचा आदेश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी काढला.
या आदेशाची अंमलबजावणी कोणी करायची? यावरून महापालिका, पोलिस, अन्न प्रशासन व पशुसंवर्धन विभागात संभ्रम असल्याने या भागातील चिकन विक्री खुलेआम सुरू होती.
किल्ला बाग व धर्मवीर संभाजी महाराज तलाव परिसर २१ दिवसांसाठी प्रतिबंधितही केला आहे. या ठिकाणी माणसांचा बिनधास्त वावर असल्याचे दिसले.
सोलापुरात कावळ्यांचा मृत्यू वाढत असताना प्रतिबंधात्मक आदेशाच्या अंमलबजावणीसाठी शासकीय विभाग टोलवाटोलवी करताना दिसत आहेत. विजापूर रोडवरील तलाव परिसरात दोन मृत कावळे नागरिकांना दिसले.
0 Comments