महापालिका कामगाराच्या मृत्यूनंतर आयुक्त डॉ. ओंबासे यांच्याकडून सांत्वन
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर महानगर पालिकेत कार्यरत असलेले शिवाजी कदम (बिगारी )याचं ११ मार्च २०२५ रोजी सकाळी कामावर असताना हृदय विकराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे व सूरज सांगे (सफाई कामगार ) याचं १४ मार्च २०२५ रोजी कामावर असताना हृदय विकराच्या झटक्याने मुर्त्यू झाले असून आज महापालिकेचे आयुक्त डॉ सचिन ओम्बासे यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन परिवाराचे सांत्वन पर भेट घेतली.
यावेळी अतिरिक्त आयुक्त रवि पवार, मुख्य सफाई अधिकारी नागनाथ बिराजदार उपस्थिती होते. हे दोन्ही कर्मचारी नेमून दिलेले कामं उत्कृष्ठ रित्या करत होते. आयुक्त यांनी मयत कर्मचारी यांच्या परिवारातील व्यक्तींना लवकरत लवकर मनापा सेवेत समवून घेतले जाईल असे आश्वासन दिले.
0 Comments