Hot Posts

6/recent/ticker-posts

गृहमंत्र्यांनी धनंजय मुंडेंवर 302 चा गुन्हा दाखल करावा; मनोज जरांगे संतापले

 गृहमंत्र्यांनी धनंजय मुंडेंवर 302 चा गुन्हा दाखल करावा; 

मनोज जरांगे संतापले

 जालना (कटूसत्य वृत्त):-मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात रोज नवं नवीन खुलासे समोर येत आहेत. संतोष देशमुख यांचे अपहरण करून हत्या केल्याची कबुली सुदर्शन घुले याने दिली आहे. अशी माहिती सुत्रांनी दिली. त्यानंतर आता अनेक साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले असून ऑफिस बॉयने आपल्या जबाबात मोठा गौप्यस्फोट केला आहे. ६ डिसेंबर २०२४ला वादा प्रकल्प परिसरात सुदर्शन घुलेने गोंधळ घातला होता. तसेच संतोष देशमुख यांना जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचे त्याने जबाबात सांगितले आहे. या सर्व घडामोडीवर मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी माजी मंत्री धनंजय मुंडे आणि आमदार सुरेश धस यांच्यावर निशाणा साधला आहे. देशमुख हत्या प्रकरणात सरकारचे काही प्रतिनिधी घुसले आणि त्यांनी धनंजय मुंडे यांना वाचवलं आहे. त्यांनी हे डोक्यावर घेतलेलं पाप आहे, त्याचे परिणाम आणि फळ त्यांनाही भोगावे लागेल. तसेच, धनंजय मुंडेंवर 302 चा गुन्हा दाखल करावा. धनंजय मुंडे यांच्या कार्यालयात ही बैठक झाली, त्याच्यानंतर खंडणी अपहरण आणि खून धनंजय मुंडे यांनी घडवून आणला,असे मनोज जरांगे यांनी म्हटले आहे.

संतोष देशमुख यांच्या हत्येसाठी मुंबई आणि परळीतल्या धनंजय मुंडे यांच्या कार्यालयात बैठक झाली. त्यामुळे या प्रकरणात सामूहिक कटात सहभागी म्हणून धनंजय मुंडे यांना सहआरोपी केलं पाहिजे. त्याचबरोबर या प्रकरणात आरोपींना ज्यांनी ज्यांनी सहकार्य केले. त्यांनाही सहआरोपी का केलं नाही ? असा सवालही जरांगे यांनी केला आहे. त्यामुळे धनंजय मुंडेंना या प्रकरणात आरोपी करत या प्रकरणाचा पुन्हा तपास करावा, अशी मागणी जरांगे यांनी केली. 

धनंजय मुंडे यांची ही संघटित गुन्हेगारी आहे, कुठे खंडण्या वसूल करायच्या, हा पैसा धनंजय मुंडेंना दिला जायचा. हत्याप्रकरणातील 1 नंबरचा आरोपी टोली तयार करून अशी कृती करत होता. एक नंबरच्या आरोपीनेच खंडणीसाठी खून करायला लावल्याचं सिद्ध झाले आहे. धनंजय मुंडेनेच मोर्चे काढायला लावले, रस्ता रोको आंदोलन करायला लावले. माझा संबंध नसताना माझ्या फोटोला धनंजय मुंडेनीच चपला हाणायला लावल्या. तुम्ही असं कितीही कृती केलं तरी नियतीला मान्य नसतं. तुम्हाला याचं फळ मिळालं, असे जरांगे पाटील यांनी म्हटले.

Reactions

Post a Comment

0 Comments