अक्कलकोट येथे 20 मे रोजी सामुदायिक विवाह सोहळा
शिव-बसव डॉ.बी.आर.आंबेडकर मागासवर्गीय बहु. सामाजिक संस्थेचा उपक्रम
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- शिव-बसव - डॉ. बी. आर. आंबेडकर मागासवर्गीय बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने मंगळवार दि. 20 मे 2025 रोजी सायंकाळी 5:30 वाजता अक्कलकोट येथील ए वन चौकातील प्राथमिक शाळेत सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती संस्थापक संदीप मडीखांबे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
गेल्या सात वर्षापासून संस्थेच्या वतीने सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करण्यात येतो. आतापर्यंत 129 जोडप्यांचा विवाह लावण्यात आला आहे. दरम्यान या अंतर्गतच प्रथम करण्यात आल्यास संस्थेकडून मुलीच्या नावे वयाच्या 18 व्या वर्षापर्यंत तीन हजार रुपये फिक्स डिपॉझिट ठेवण्यात येणार आहे. तसेच एक वर्षाचा तीन लाख रुपयांचा अपघात विमा उतरवण्यात येणार आहे.
या विवाह सोहळ्यात वधू वरांना मणी मंगळसुत्र, जोडवे, हार गुच्छ, वधूस विधीची साडी, शालु, सॅंडल, वराच विधीचा पोशाख, सूट कोट, बुट, संसारउपयोगी भांडी प्रत्येकी ५ नग, खाट, गादी, कपाट आदी वस्तू देण्यात येणार आहेत.
इच्छुक वधू-वरांनी नाव नोंदणीसाठी संदीप मडीखांबे - 985078658, विकास गायकवाड- 90 21 33 05 52, हर्षवर्धन सोनकांबळे 9561104747 मरेप्पा शिवशरण 9273098414 यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
या पत्रकार परिषदेस विकास गायकवाड, महेश नडगम, बंटी नडगम, महादेव थोरे आदी उपस्थित होते.
0 Comments