वाफळेच्या सुहास चव्हाण ची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड
अनगर (कटूसत्य वृत्त):- मोहोळ तालुक्यात वाफळे हे आवर्षणग्रस्त असणारे एक छोटेसे गाव या गावात सौ.आशा व हनुमंत चव्हाण हे आपल्या कुटुंबासमवेत शेतीचा व्यवसाय करतात अनेक दिवस कुटूंबासाठी मजुरी केली. त्यांना दोन मुले एक ऋषिकेश व दुसरा सुहास ऋषिकेश याने जिद्द कष्ट आणि अथक परिश्रम करून गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज मिरज या ठिकाणी एमबीबीएस साठी प्रवेश मिळवला तो अंतिम वर्षात आहे तर सुहास हा दुसरा मुलगा कालच लागलेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून पोलीस उपनिरीक्षक पदावर त्याची निवड झालेली आहे.
खरोखरच लक्ष्मी आणि सरस्वती एका ठिकाणी नांदत नाहीत हेच खरे कारण सामान्य परिस्थिती असतानाही परिश्रमाच्या जोरावर सुहासने यश खेचून आणलेले आहे याबद्दल संपूर्ण परिसरात या दोन रत्नांचे कौतुक होत आहे.
सुहास चव्हाण यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाफळे येथे माध्यमिक शिक्षण श्री जगदंबा विद्यालय वाफळे तर उच्च माध्यमिक नेताजी ज्युनिअर कॉलेज मोहोळ येथे झाले असून उच्च शिक्षण मॉडर्न कॉलेज पुणे येथे झालेले आहे पुढे त्याने कायद्याचाही अभ्यास केलेला आहे
कुठलीही कौटुंबिक पार्श्वभूमी नसताना सामान्य परिस्थितीतून केवळ जिद्द कष्ट आणि परिश्रमाच्या जीवावर मिळवलेले यश याचे संपूर्ण वाफळे परिसरात त्यांचे कौतुक होत आहे.
कोट-
"बालपणीच पोलिस दलात जाण्याचे स्वप्न पाहिले होते. कठोर परिश्रम, सातत्य आणि आई वडिलांचा पाठिंबा व विश्वास ; मित्राची साथ यामुळे आज पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदासाठी निवड झाली आहे.
माझ्यासाठी माझ्या आईवडिलांचे कष्ट हेच सर्वात मोठी प्रेरणा होती.
समाजासाठी न्याय आणि सुरक्षितता प्रस्थापित करणे हा माझा ध्यास असेल.
महाराष्ट्र पोलिस दलाचा एक भाग होण्याचा अभिमान वाटतो!"
येणाऱ्या तरुण पिढीला माझा संदेश राहील की त्यांनी आपले ध्येय निश्चित करून प्रामाणिक कष्ट केल्यास यश निश्चित आहे
(सुहास हनुमंत चव्हाण पोलीस उपनिरीक्षक)
0 Comments